गोकाक : गोकाक शहरातील महालिंगेश्वरनगर (Mahalingeshwara Nagar Gokak) परिसरात सोमवारी पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे येथील घराची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत तीन वर्षांच्या कृतिका नागेश पुजारी हिचा जागीच मृत्यू झाला असून, तिची मोठी बहीण खुशी (वय ६ वर्षे) गंभीर जखमी झाली आहे.