esakal | आम्हाला पाणी द्या ! कर्नाटकची महाराष्ट्राकडे विनंती...
sakal

बोलून बातमी शोधा

The Karnataka government has requested the Maharashtra government to release six TMC of water

येडियुराप्पा यांचे उद्धवना पत्र : सहा 'टीएमसी'ची गरज

आम्हाला पाणी द्या ! कर्नाटकची महाराष्ट्राकडे विनंती...

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी - सध्या उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये  पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वारणा किंवा कोयनेतून कृष्णा नदीला व उजनी धरणातून भीमा नदीला असे, एकूण सहा टीएमसी पाणी साेडण्याची विनंती  कर्नाटक सरकारने महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.  तसे पत्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.  एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी म्हटले आहे. याबद्दल पत्रातील माहिती अशी, उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, रायचूर,  कलबुर्गी, यादगीर या भागात सध्या  पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. याची कल्पना आपल्याला असावी.

वाचा - वा रे बहाद्दर !  सलग 33 तास प्रवास करत मुलं सुखरूप पोहचवली कोल्हापुरात...

 सध्या उन्हाळा सुरू असल्याने दिवसेंदिवस पाण्याची कमतरता  जाणवत आहे. यापूर्वी मानवतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाची मागणी वेळोवेळी मान्य केली आहे. शिवाय पाणी सोडून सहकार्य केले आहे. यंदा वारणा किंवा कोयनेतून कृष्णेला तीन टीएमसी व उजनी धरणातून भीमा नदीला तीन टीएमसी पाण्याची गरज आहे. कर्नाटक शासनाची विनंती महाराष्ट्र शासनाने मान्य करावी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे निर्देश देऊन कार्यवाहीतून सहकार्य करावे.

महाराष्ट्राचा निर्णय काय ?

गतवर्षी  महाराष्ट्र सरकारने पाणी न सोडल्याने  कृष्णाकाठ कोरडा पडला होता. महाराष्ट्रातून पाणी न आल्याने हिडकल जलाशयातून कृष्णेला पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे यंदा कर्नाटकच्या मागणीवर महाराष्ट्र शासन काय निर्णय घेणार? ते पहावे लागेल.

loading image
go to top