esakal | नविन वर्षात कर्नाटकात सफर करा आता नविन बसमधून
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka State Transport Corporation decision for Transportation electric buses in January


हुबळ्ळी, चिक्कोडी विभागाचा समावेश : डिझेल खर्चाची होणार बचत

नविन वर्षात कर्नाटकात सफर करा आता नविन बसमधून

sakal_logo
By
विकास पाटील

निपाणी (बेळगाव) : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने नुकसान टाळण्यासह खर्चाची बचत करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्या 360 इलेक्ट्रीक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसना केंद्र व राज्य सरकारने अनुमती दिली आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरु आहे. सध्या या बसेस प्रायोगिक तत्वावर बंगळूर येथे सुरु केल्या आहेत. तेथे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून डिझेल खर्चाची बचत होत आहे. त्याचा फायदा महामंडळाला होणार आहे. जानेवारी 2021 मध्ये हुबळ्ळी, चिक्कोडी विभागात या बसेस दाखल होणार असून त्या शहरी भागासह लांब पल्ल्यावर धावणार आहेत. सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर ५ बसेस पाठविल्या जाणार आहेत. त्याचा प्रतिसाद पाहून पुढील जादा बसेस देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. 


गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र बंदसदृश्य परिस्थिती होती. तसेच लाॅकडाऊन असल्याने बससेवा ठप्पच झाली होती. त्यामुळे परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. तसेच निधीची तरतूद करून कर्मचाऱयांचे वेतन द्यावे लागले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शहरासह लांब पल्ल्याच्या बसेस सुरु झाल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील बससेवेला प्रवाशांचा अद्यापही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळे काही गावात रिकाम्याच बसेस धावत आहेत. त्यामुळे डिझेलसह दुरुस्तीच्या खर्चाचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत आहे. त्यासाठी ही पर्यायी व्यवस्था शोधली असून त्याचा लाभ होणार आहे. बंगळूर विभागात या बसेस सध्या सुरु आहेत. त्यामुळे आठ महिन्यापासून झालेला तोटा काही अंशी भरून निघत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा- सात वर्षांनंतर आई-मुलाची  माऊली कृपेने झाली भेट

`सध्या बंगळूर येथे प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रीक बससेवा सुरु केली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डिझेल खर्चाचीही बचत होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात चिक्कोडी, निपाणीतून ही सेवा सुरु करणार आहोत.`
-व्ही. एम. शशीधर, विभागीय नियंत्रणाधिकारी, चिक्कोडी.

अशी असेल बस
*२ तास चॅर्जिंगवर धावणार ३०० किलो मीटर.
*आरामदायी आसन क्षमता ६०.
*स्वयंचलित दरवाजे २.
*बसमध्येच मिळणार पुढील थांब्याच्या सूचना.
*बॅटरी, अल्टरनेटरचा वापर. 
*डिझेल खर्चाची होणार बचत.
*शहरासह लांब पल्ल्याच्या प्रवासास उपयुक्त.
*महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढणार.

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top