
चर्चेसाठी एकत्र; निवेदिता माने, मंत्री यड्रावकर विरोधकांच्या बैठकीत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चेअरमन निवड काही काही वेळातच होणार असून, सर्किट हाऊस येथे सत्ताधारी विरोधी आघाडीच्या बैठका सुरू आहेत. (KDCC) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) व पालकमंत्री सतेज पाटील (Satej patil) हे सत्ताधारी आघाडीच्या संचालकांची बैठक घेत आहेत. तर शिवसेना नेते खासदार संजय मंडलिक हे विरोधी संचालकांची बैठक घेत आहेत. महत्वाचे म्हणजे खासदार मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या बैठकीत सत्ताधारी गटाच्या संचालक निवेदिता माने (Nivedita mane) व आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा: फडणवीसांची अवस्था म्हणजे कोणी खुर्ची देता का... : संजय राऊत

सर्किट हाऊस येथे सकाळपासून जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची लगबग सुरू आहे. सताधरी गटाचे संचालक सर्किट हाऊस येथे पोहचत आहेत. येथून ते सर्व जिल्हा बँकेत जाणार आहेत. तर विरोधातील शिवसेनेची बैठकही सर्किट हाऊस येथे सुरू आहे. या बैठकीस आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, शिवसेना खासदार आणि जिल्हा बँकेचे नूतन संचालक खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील असुरलेकर, प्रा. अर्जुन आबिटकर यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित आहेत.
हेही वाचा: मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या पोस्टवर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण
Web Title: Kdcc Bank Election Elected Chairman Meeting Of Political Leaders In Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..