esakal | जोतिबा डोंगरावर खेट्यांना प्रारंभ... दिड लाख भाविक दर्शनाला...
sakal

बोलून बातमी शोधा

The khatayas started formally at the Jotiba Temple from today

जोतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून पारंभ झाला. कुशिरे, पोहाळे तर्फ आळते, गिरोली, दाणेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी रस्ते गर्दीने फुलून गेले. पहाटेच्या प्रहरी हा डोंगर परिसर चांगभलं च्या गजराने जयघोषाने दुमदूमून गेला.

जोतिबा डोंगरावर खेट्यांना प्रारंभ... दिड लाख भाविक दर्शनाला...

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावान चांगभलच्या जय घोषात
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर ता. (पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात येथे आज पासून खेटयांना प्रारंपारिक पद्धतीने प्रारंभ  झाला.

त्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, या राज्यातून दिड लाखो भाविक दर्शनासाठी आले. या पहिल्या खेटया लाच आज उचांकी गर्दी झाल्याने उर्वरित खेटे ही हाऊस फूल होतील असे पुजाऱ्यांनी सांगीतले. दरम्यान, आज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभिषेक, सालंकृत महापूजा तसेच धुपारती सोहळा झाला. जोतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्यापासून पारंभ झाला. कुशिरे, पोहाळे तर्फ आळते, गिरोली, दाणेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी रस्ते गर्दीने फुलून गेले. पहाटेच्या प्रहरी हा डोंगर परिसर चांगभलं च्या गजराने जयघोषाने दुमदूमून गेला. कोल्हापुरातील भाविक पंचगंगा नदीपासून अनवाणी पाय चालत आले, तर पंढरपूर, बार्शी, बेळगाव, सांगली, सातारा या भागातील भाविक गाय मुख तलाव मार्गे पायी आले.

वाचा - राजू शेट्टींनी केलं आवाहन अन् तरुणीने घेतला हा धडाकेबाज निर्णय... 

सकाळी अकरा नंतर गर्दी थोडी कमी झाली पण दुपार नंतर भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत राहील्या. डोंगरावर आज कोडोली पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्रास भाविकांना  सुरळीतपणे दर्शन घेता आले. देवस्थान समितीच्या वतीने  मंदिरात ज्यादा गार्ड ठेवण्यात आले होते. दिवसभर डोंगरावर स्वान पथक फिरवण्यात आले. दुपारी बारा वाजता मंदिरात धुपारती सोहळा झाला. या सोहळ्यास देवस्थान समितीचे अधिक्षक महादेव दिंडे, सिंदीया ट्रस्टचे अधिक्षक आर टी कदम  सर्व देव सेवक पूजारी ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे होणाऱ्या खेट्यांना प्रसाद वाटप होईल. कोल्हापूरातील भाविक पुढील खेट्यांना पुजाऱ्यांच्या घरी नैवेद्य करतील. यंदा जोतिबाची चैत्र यात्रा ७ एप्रिल रोजी आहे. 

 चैत्र यात्रा दिड महिन्यांवर येऊन ठेपल्याने यात्रा आढावा बैठका सुरू होतील. त्यात यात्रेचे नियोजन करण्यात येईल असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

खेटयाच्या पार्श्व भूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. शनिवारी रात्रीच डोंगरावर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. डोंगरावर पहाटे दरवाजा उघडताना  भाविकांनी कोणत्याही प्रकारचा दंगा , केल्यावर त्यांना पोलीशी खाक्या दाखवल्यावर या हुलडबाजीस आळा बसला. त्यामुळे पुढील खेटयांना शिस्त बसेल. - सुरज बनसोडे. (सहायक पोलीस निरीक्षक कोडोली पोलिस ठाणे) 

loading image