शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुललं हसु; जातिवंत खिल्लार 10 लाखांवर जाणार

जातिवंत खिल्लार बैलाची किंमती १० लाखांवरून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत खाली आली होती.
kolhapur
kolhapur esakal

कोल्हापूर : महाराष्ट्रात सात वर्षांपूर्वी बैलगाडींच्या शर्यतींवर बंदी आणली आणि दूध, अंडी, मटकीसह विविध सकस खाद्य देऊन तयार केलेल्या शर्यतीच्या बैलांच्या किंमती दहा ते बारा लाखांवरून दीड ते दोन लाखांपर्यंत खाली आल्या. त्यामुळे शर्यती शौकिन म्हणून, हौस म्हणून किंवा कुटुंबाचा चरितार्थ म्हणून संगोपन केल्या जाणाऱ्या बैलांचे संगोपन कमी होताना दिसले. यातच आज सर्वोच्च न्यायलयाने शर्यतींना सशर्त दिलेल्या परवानगीमुळे लाखांचा जातिवंत खिल्लार बैल आता दहा लाखांवर जाणार असल्याचे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

एखाद्याच्या घरी अलिशान वाहन असावे तसे शेतकऱ्यांच्या किंवा शर्यती शौकिनाच्या घरी अस्सल खिल्लारी बैल असणे म्हणजे रुबाबदारपणाचे समजले जाते. दरम्यान, राज्यात शर्यतींवर बंदी आणली. त्यानंतर कोरोनामुळे बैलांचा बाजार बंद झाला. याचा फटका संगोपन पशुपालकांना बसला होता. जातिवंत खिल्लार बैलाची किंमती १० लाखांवरून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत खाली आली होती. ज्यांना जातिवंत खिल्लार परवडत नाही, असे शर्यती शौकिन त्यापेक्षा धनगरी खिल्लार, देशी खिल्लार बैलांना पसंती देतात. या बैलांची किंमत ही ४ ते ५ लाखांपर्यंत असते किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. दरम्यान, ज्यांनी-ज्यांनी आतापर्यंत बैलांचा सांभाळ केला त्यांचे श्रमाचे फळ मिळाले म्हणायला हरकत नाही.

kolhapur
सत्ताधारी पॅनेलची 3 दिवसात घोषणा; सेनेला देणार 2 जागा

"कोल्हापूर जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळसह इतर ठिकाणानाहून अस्सल खिल्लारी बैल ९ ते १० लाख रुपयेला आणले जातात. बैलांच्या किंमती जास्त आहेत. शर्यतीवरील बंदी उठवल्यामुळे पुन्हा एकदा याच्या किंमती निश्‍चितपणे वाढणार आहेत."

- रमेश पाटील, बैल मालक

शर्यती दरम्यानचे अर्थच्रक

एखाद्या ठिकाणी शर्यती असतील तर त्याठिकाणी शेतीसाठी लागणारे साहित्य, जनावरांसाठी लागणारी दोरी, वेसन, पतरी, खाद्यांसह इतर साहित्य विक्रीसाठी ठेवले जाते. याशिवाय, कुरपे, नांगर, कीटकनाशकांचे छोट स्टॉलही तात्पुरते उभारले जातात. यामुळे तीन ते चार तासात छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय होतो. त्यामुळे शर्यतीला विशेष महत्त्‍व आहे.

kolhapur
चीन सीमावाद रशियाची मध्यस्थी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com