गिर्यारोहकांनो चला ‘किलचा’ची चढाई करायला...

kilcha is different place for climbing near by tulsi dam
kilcha is different place for climbing near by tulsi dam

धामोड - राधानगरी तालुक्‍यातील तुळशी जलाशयाच्या काठावरील ‘किलचा’ गिर्यारोहकांना चढाईसाठी निश्‍चिततच वेगळी अनुभूती देणारा आहे. सह्याद्री पठाराच्या रांगड्या सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणजे ‘किलचा’ परिसर होय. येथे लोकांना पर्वत चढाई करण्यास विशेष आवडते. 

कसा आहे हा किलचा ?

भोगावती कारखान्यापासून सहा किलोमीटरवर शिरगाव फाटा लागतो. तिथूनच धामोडच्या तुळशी धरणावर जाता येते. या मुख्य रस्त्यावर हे धरण आहे. हा परिसरही मनोहारी आहे; तर त्याच्या बाजूला नव्याने झालेला लोंढा प्रकल्प लोकांना आकर्षित करत आहे. या दोन्ही तलावांच्या पश्‍चिमेला एक उंचच उंच सुळका आहे. त्यालाच ‘किलचा’  म्हणतात. दूरवरून किल्ल्यासारखा दिसतो, म्हणून हा किलचा. 

किलचा म्हणजे एक कातळ, चोहोबाजूंनी तासलेले कडे आणि मधोमध दोन-तीन एकर भरेल इतका सपाट भाग. आसपासच्या अर्धगोलात सर्वांत उंच असे हे शिखर; परंतु चढाईला अवघड. तरी गिर्यारोहकांना आवडेल असे आणि नवख्यांनाही नवलाईचे. लांबून एखाद्या किल्ल्यासारखा भासतो. चारही बाजूने मोठे मोठे कडे असून वरील भाग सपाट आहे. या ठिकाणी जाण्यासाठी जंगलातून जावे लागते. चारही बाजूंना घनदाट जंगल, प्राण्यांच्या गुहा, औषधी वनस्पती, पशुपक्षी असे सौंदर्य लाभले आहे. पठारावरून दिसणारे सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. ऐतिहासिक काळामध्ये हे पठार बुरुज म्हणून देखील याची नोंद सापडते. या ठिकाणावरून राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा या तिन्ही तालुक्‍याची टेहळणी करता येते. हे पठार पर्यटकांसाठी आगळीवेगळी पर्वणीच आहे.

कसे याल..?

किलचा पाहण्यासाठी यायचे तर, एक केळोशी, आपटाळमार्गे; तर दुसरा म्हासुर्लीच्या अलीकडून बाजारीच्या धनगरवाड्यावरून थेट त्याच्या पायथ्याला गेलेला. हा मार्ग साधारणतः बरा आहे. दोन्हींकडील बाजूंनी वर आले; तरी या किलच्यावर जाण्यासाठी एकच पायवाट आहे.

राधानगरी आणि गगनबावडा तालुक्‍यांच्या हद्दीवर असणारा एक लोभसवाणा डोंगर म्हणजे किलच्याचा डोंगर. सरत्या पावसाळ्यात रानफुलांनी सजणारा विस्तीर्ण सडा पाहत राहावा, असा असतो. पण, सड्याच्या पोटात असणाऱ्या आरपार गुहा हे याचे वैशिष्ट्य. उंचीमुळे आणि घनदाट झाडीमुळे ऐन उन्हाळ्यातही शीतलता देणारा हा परिसर धाडसी पर्यटकांनी आवर्जून पाहावा, असाच आहे.
- अमर अडके, इतिहास अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com