Kingdom of Poland : दुसऱ्या महायुद्धात पोलंड नागरिकांना आश्रय देणारं करवीर संस्थान! आजही आहेत ऋणानुबंध

पोलिश लोक मूळ स्लाव्ह वंशाचे असून त्यांची भाषा पश्चिम स्लाव्ह भाषासमूहातील आहे.
Kingdom of Poland : दुसऱ्या महायुद्धात पोलंड नागरिकांना आश्रय देणारं करवीर संस्थान! आजही आहेत ऋणानुबंध

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील नागरिकांना छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरात आश्रय दिला होता. ५ वर्ष ते लोक आपले पाहुणे म्हणून राहिले होते. याच पोलंड देशाचा इतिहास पाहता असे लक्षात येते की, या देशाला पहिल्यापासूनच हाल सोवावे लागले आहेत. कारण, १७७२, १७९३ आणि १७९५ असे तीन वेळा पोलंडचे विभाजन करण्यात आले होते. काही काळानंतर पहिल्या नेपोलियनने ऑस्ट्रिया, प्रशिया देशांना शह देण्यासाठी २७ नोव्हेंबर १८१५ मध्ये चालणारे ग्रँड डची ऑफ वॉर्सा हे पोलंडचे राज्य स्थापन केले होते. याच दिवशी तिथल्या नागरिकांनी संविधान स्वीकारले होते. तोच हा पोलंड देश होय.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पोलिश लोक मूळ स्लाव्ह वंशाचे असून त्यांची भाषा पश्चिम स्लाव्ह भाषासमूहातील आहे. दहाव्या शतकात प्यास्ट घराण्याचा राजा पहिला म्येश्कॉ पोलंडच्या काही भागावर राज्य करीत होता. त्यानंतर अनेक वर्ष तिथे राजे राज्य करून गेले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची चाहुल लागली आणि पोलंड नागरिक पून्हा शत्रूच्या निशान्यावर आले.

जर्मनीशी बिघडणारे संबंध व त्यातील धोका लक्षात घेऊन पोलंडने इंग्लंड-फ्रान्सशी संरक्षक तह केले परंतु, त्यांची पर्वा न करता १ सप्टेंबर १९३९ रोजी युद्ध न पुकारताच जर्मनीने पोलंडवर स्वारी केली व अवघ्या पंधरा दिवसांत पोलंडला शरणागती पतकरावी लागली. जर्मनी व रशिया यांच्यातील तहामुळे पोलंड देश त्या दोघांत विभागला गेला. पुढे १९४१ मध्ये जर्मनी-रशिया युद्ध सुरू होताच रशियाव्याप्त पोलिश मुलूखही जर्मनीच्या ताब्यात गेला.

दुसऱ्या महायुद्धाच्या सहा वर्षांच्या काळात रशियन लष्कराने १९४४ मध्ये पोलंडमधील लोकांना त्यांच्याच देशातून हुसकावून लावले. दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्या भावंडांसारखे आपलेही प्राण जातील या भीतीने पोलिश नागरिक वाट दिसेल तिकडे धावत सुटले होते. त्यावेळी अनेक पोलंडवासीय आधी रशियाला आसरा शोधायला गेले. सुरुवातीला युद्धबंदी म्हणून रशियाने त्यांचा सांभाळ केला. मात्र ज्यावेळी रशिया जर्मनीच्या विरुद्ध युद्धात उतरले त्यावेळी या पोलिश लोकांचा सांभाळ करणे परवडेनासे झाले. त्यावेळी युद्धकाळातल्या पोलंड सरकारने जगभरात आमच्या निर्वासितांची सोय करा अशी विनंती केली अनेक देशांकडे केली.

या अडचणीच्या काळात भारत पुढे सरसावला. भारतातील गुजरात जामनगरच्या बालाचडी आणि छत्रपती शाहु महाराजांचे करवीर संस्थानांनी या पोलंड वासियांना मदतीचे आश्वासन देत त्यांना भारतात येऊन राहण्याचा निरोप पाठवला. त्यांचा निरोप मिळताच पोलिश नागरिक भारतात आले. त्यावेळी जामनगरमध्ये ५०० तर कोल्हापूरच्या वळीवडे गावात ५००० पोलिश लोकांची राहायची सोय करण्यात आली होती. ते १९४३ ते १९४८ या सालात कोल्हापूरमध्ये आश्रयास होते.

पोलिश नागरिक तिथे येण्याआधी ते एक जंगल होते. कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती राजाराम महाराज पाच-सहा महिन्यांतून कधीतरी येणेजाणे व्हायचे. त्या जंगलाच्या शेजारीच वळीवडे गाव होते. चारशे ते पाचशे लोकवस्तीचे. याच जंगलात या पोलंड रहिवाशांची राहण्याची सोय करण्यात आली.

या कुटुंबांसाठी छावण्या (बरॅक) बांधण्यात आल्या. १९४३ पासून पुढे पाच वर्षे या ठिकाणी सुमारे १० हजार लोकांच्या, विशेषत: महिला आणि मुलांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दोन स्वयंपाक घर, स्नानगृह आणि व्हरांडा अशा स्वरूपाचे घरही बांधून देण्यात आले होते. गरजेच्या वस्तू त्यांना सहजपणे मिळण्यासाठी आठवडी बाजारही भरवण्यात येत होता. या वसाहतीत घरांसोबत शाळा, पाच मुख्य सरकारी बंगले, एक सायन्स कॉलेजही होते.

पोलंड वासीयांच्या मनात आजही वळीवडे कॅम्पबद्दल आदराचे स्थान आहे. २०१९ आणि २०२१ मध्ये वळीवडेला जोरदार पुराचा फटका बसला होता. त्यावेळी पोलंडमधील नागरिकांनी गावाला आर्थिक मदत केली होती.

दुसरे महायुद्ध संपायच्या टप्प्यात आले तेव्हा त्यांच्या मायदेशी रवानगीचे सरकारी फर्मान निघाले. त्यांना मुंबईहून विमानाने मायदेशी पाठवण्यात येणार होते. लांब प्रवासाचे साधन म्हणून सागरी जहाजांऐवजी विमाने रूळावली होती. पोलिश निर्वासित मायदेशी परतण्यापूर्वी स्थानिक लोकांचा निरोप घेऊ लागले. आजवर अनेक ठिकाणी फिरून जीव वाचवणाऱ्या या नागरिकांसाठी सुखद गोष्ट अशी होती की, हे त्यांचे शेवटचे स्थलांतर ठरले आणि ते कायमचे आपल्या देशात गेले.

२०१९ मध्ये वळीवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण कार्यकमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी या कॅम्पमध्ये राहिलेल्या लुडमिला जॅक्टोव्हीझ याही सहभागी झाल्या होत्या.

‘भारत ही पवित्र भूमी आहे. या भूमीत वास्तव्यास असताना मी 11 वर्षांची होते. आईने माझ्या हातात घातलेल्या दोन बांगड्या आजही आहेत. कोल्हापूरची ही आवठवण मी आजही माझ्यासोबत ठेवली असल्याची भावना लुडमिला यांनी यावेळी व्यक्त केली होती. पोलंडमधील काही महिलांनी इथल्याच पुरूषांशी लग्न करून भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता. आजही ते लोक कोल्हापूर वासियांच्या या मदतीला विसरलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com