कोल्हापूर : आलमट्टीतून विसर्ग वाढवला

आणखी दोन दिवस मुसळधार; पंचगंगेच्या पातळीत वाढ
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारपासून कधी मुसळधार तर कधी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. राधानगरी धरणात सध्या ४.७० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून १३५० क्‍युसेक विर्सग होत आहे. जिल्ह्यातील पन्नास बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीची पाणीपातळी मध्यरात्री १२ वाजता ३४.९ फूट झाली होती.

आलमट्टी धरणातून मंगळवारी (ता. १२) सकाळी दहापासून विसर्ग ७५ हजारांवरून एक लाख क्युसेक करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून विसर्ग ७५ हजार क्युसेक होता. सध्या धरणात पाणीसाठा ८७.९९ टीएमसी आहे. धरणात एक लाख चार हजार ८५२क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या कोयना धरणात ३५ टीएमसी पाणीसाठा आहे.

आलमट्टी धरणातून ६० हजार क्‍युसेक विर्सग वाढवल्याने दिलासा मिळणार आहे. सकाळी सहापासून सायंकाळी सातपर्यंत पंचगंगा नदीची पातळी एक फूट वाढली आहे.जिल्ह्यात सकाळपासून राधानगरी, गगनबावडा व शाहूवाडी तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. इतर ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले. रस्ते, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढत गेली आहे.

आज सकाळी सहाला पंचगंगा नदीची पाणीपातळी ३३ फूट ६ इंच होती. सायंकाळी सहाला ३४.४ फुटांपर्यंत गेली आहे. पातळीत सुमारे फूटभर वाढ झाल्याने प्रशासन सर्तक झाले आहे. सायंकाळी सहानंतर पावसाचा जोर कमी राहिला आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होण्यास मदत होईल, अशी चिन्हे आहेत. जिल्ह्यात आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.

बंधारा* पाणीपातळी

राजाराम* ३४.५ फूट

नृसिंहवाडी* ४२.६ फूट

शिरोळ* ४४ फूट

इचलकरंजी* ५८ फूट

तेरवाड* ५२ फूट

५० बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील - हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व शिरगांव, कासारी नदीवरील - वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील - सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील - कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील - कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील - चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे व चावरे, दुधगंगा नदीवरील - दत्तवाड, सुळकूड व सिद्धनेर्ली, कुंभी नदीवरील - शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील - बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील - कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील - सुळे, पणुरे व आंबर्डे असे ५० बंधारे पाण्याखाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com