esakal | कोल्हापूर : शेतकरी अपघात योजनेअंतर्गत १२६ शेतकऱ्यांना लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

कोल्हापूर : शेतकरी अपघात योजनेअंतर्गत १२६ शेतकऱ्यांना लाभ

sakal_logo
By
रमेश पाटील

म्हाकवे : शेतामध्ये काम करत असताना अथवा अन्य कारणाने अपघात होऊन कर्ता पुरुष गेल्याने शेतकरी कुटुंबाची वाताहत होते. या शेतकरी कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केलेली आहे.

सदर योजनेसाठी १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या ११८ दिवसाच्या कालावधी मध्ये राज्यामध्ये कोणतीच विमा कंपनी कार्यरत नव्हती. या कालावधीत ही योजना बंद होती. सदर कालावधी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १२६ अपघातग्रस्त शेतकरी, त्यांचे वारसदार योजनेच्या लाभापासून वंचित होते. महाराष्ट्र शासनाने याबाबतची दखल घेत विशेष बाब म्हणून २३ ऑगस्ट २०२१ रोजी शासननिर्णय घेत १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या खंडित कालावधीतील विमा दाव्यांना शासन स्तरावर मंजुरी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२६ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अडीच कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा: 'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

या कालावधी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १२४ अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख व अपंगत्व प्राप्त झालेल्या दोन शेतकऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा लाभ होणार आहे. शासनाने सन २०२१-२२ या वर्षी करिता दिनांक ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

पुढे सुरू ठेवण्यास मंजुरी दिलेली आहे. तथापि खंडीत १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या कालावधी बंद असणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधित शेतकरी व त्यांचे वारसदार यांनी विहित नमुन्यायील विमा दावे प्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागातील, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी ,कृषी सहायक, ग्राम पातळीवरील कृषी पर्यवेक्षक तथा सदरकर्ता अधिकारी यांचेशी संपर्क करावा.

तरी सदर कालावधीतील परिपूर्ण प्रस्ताव क्षेञिय स्तरावरुन प्राप्त करुन घेऊन सदर प्रस्तावांची तालुका व जिल्हा स्तरावर छाननी करण्यात येणार आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी कृषी आयुक्तालय पुणे येथे सादर करण्यात येणार आहेत. तरी सर्व संबधित शेतकरी यांनी या योजनेचा तात्काळ लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

loading image
go to top