Kolhapur : ‘भोगावती’ कारखान्याची निवडणूक बिनविरोधसाठी तयार

निवडणूक लागल्यास ताकदीने लढणार
भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर
भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर sakal

शाहूनगर : ‘भोगावती साखर कारखाना वाचविण्यासाठी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत असेल, तर आपण तयार आहोत. मात्र निवडणूक लागल्यास समविचारी मंडळींना सोबत घेऊन आपण ताकदीने कारखान्याची निवडणूक लढवू’, असे प्रतिपादन भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी केले.

भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर
Crime news : ‘फादर्स डे’ला पित्याकडून मुलाची हत्या

भोगावती कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौलव (ता. राधानगरी) येथे झालेल्या कौलवकर गटाच्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत पाटील होते. मेळाव्याला करवीर व राधानगरी तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर
Crime : कपाटाचे लॉक दुरुस्त करायला आला अन् दागिने चोरून गेला

धैर्यशील पाटील म्हणाले, ‘कारखान्याची सत्ता आमच्या ताब्यात असताना आम्ही संस्थापक दादासाहेब पाटील यांच्या विचाराने कारखाना चालविला. उसाची बिले, तोडणी ओढणीची बिले वेळेत दिली. नियमितपणे कामगारांचे पगार व सभासदांना सवलतीची साखर दिली. संचित तोटा कमी केला. कारखान्याचा कारभार काटकसरीने करून कारखाना सुस्थितीत आणला. आज कारखान्याची अवस्था बिकट आहे. अशावेळी कारखाना वाचविण्यासाठी सभासदांनी येत्या निवडणुकीत आम्हाला साथ द्यावी.’

भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर
Crime : कपाटाचे लॉक दुरुस्त करायला आला अन् दागिने चोरून गेला

प्रा. डॉ. एन. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विश्वास पाटील, चंद्रहार पाटील, रघुनाथ मिठारी, युवराज पाटील, प्रा. डॉ. डी. एन. पाटील, रणजित पाटील, किरण पाटील, दीपक पाटील, अमर डोंगळे, शामराव चौगले यांची भाषणे झाली. यावेळी रघुनाथ पाटील, संजय डोंगळे, शिवाजी पारखे, सर्जेराव पाटील उपस्थित होते. प्रा. आर. बी. पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com