सांगरूळ फाट्यावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगरूळ फाट्यावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको

कोल्हापूर : सांगरूळ फाट्यावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको

कुडित्रे : शेतीसाठी विनापकपात वीजपुरवठा करावा, वाढलेले वीज बिल दुरुस्त करून मिळावे, ट्रान्स्फॉर्मर बंद असलेले डीपी तातडीने बसवावेत, या मागणीसाठी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कोपार्डे येथे परिसरातील विद्युत पंपधारक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसानी दंडूकशाही दाखलत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. शेतकरी व पोलिसांत झटापट झाली. यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, मागणीचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. कुंभी कारखाना संचालक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते; मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली.

सकाळी अकरा वाजता पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारताच व शेतकरी कार्यकर्त्यांत बाचाबाची, झटापट झाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागणीचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना दिले. दहा तारखेपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास महावितरणच्या ताराबाई पार्कातील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.

हेही वाचा: मुंबई : कांदिवलीतील हंसा हेरिटेज बिल्डिंगला आग; महापौर घटनास्थळी

कुंभी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर, विलास पाटील, संचालक बाजीराव शेलार, टी. ए. शेलार, सदाशिव शेलार, सुनील शेलार, बाबूराव पाटील, तुकाराम शेलार, व्ही. जी. पाटील, दादा पाटील, सरदार आडनाईक, सरपंच वसंत तोडकर, सरदार पाटील, धनाजी कोळी, ए. डी. पाटील, भगवान भोसले, अरुण निंबाळकर, महेश पवार, धनाजी पाटील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागण्या अशा

  • वीजपुरवठा पूर्ववत विनाकपात सलग १० तास

  • पन्नास टक्के बिल भरलेल्या शेतकऱ्यांना कनेक्शन

  • अश्‍वशक्तीप्रमाणे केलेले बिलिंग रीडिंगप्रमाणे

  • तांत्रिक कारणाने पुरवठा खंडित झाला तर वेळ वाढवून मिळावी

  • पुरात बुडालेले ट्रान्स्फॉर्मर बसवावेत

Web Title: Kolhapur Block The Way Of Farmers On Sangrul Fork

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurBlock