esakal | Kolhapur: जांभूळखोऱ्यातील चर फुटली : ५०० एकर शेतीचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

जांभूळखोऱ्यातील चर फुटली

मुरगूड : जांभूळखोऱ्यातील चर फुटली : ५०० एकर शेतीचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुरगूड : ढगफुटीच्या पावसाने अडीच महिन्यापूर्वी उद्धवस्त झालेल्या मुरगूड येथील जांभूळखोरा वसाहतीतील नागरिकांना पुन्हा एकदा चर फुटीचा फटका बसला. यात ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ५०० एकर शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने प्रचंड पाण्याचा प्रवाह सर पिराजीराव तलावाच्या कॅनॉलमधून बाहेर पडल्याने जांभूळ खोरा वासियांना त्याचा मोठा फटका बसला आहे.यामध्ये सुमारे ७० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यासाठी चर फुटीचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा: नाजूक वयात असलेल्या मुलीला गर्भवती राहण्याची सक्ती नाही : न्यायालय

अडीच महिन्यापूर्वी पण ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने जांभूळखोऱ्यातील विहिरी गाळाने भरून गेल्याने वीजेच्या मोटरी वाहून गेल्या होत्या.अनेक शेतकऱ्यांची घरे व घराच्या भिंती कोलमडून पडल्या.तर पन्नास एकरातील ऊस व सोयाबीन पिक भुईसपाट झाले होते. तलावाच्या कॅनॉलचे आणि ओव्हरफ्लोचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे जनावरांचे गोठे, राहत्या घराच्या भिंती, पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन, स्ट्रीट लाईटचे पोल व या पोलवरील विद्युत तारा तुटल्या होत्या.मुख्य रस्त्यावरील साकवही खचले होते.

त्यानंतर पुन्हा झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जांभूळखोरा परिसरातून सरपिराजी तलावास पाणीपुरवठा करणारी चर दुसऱ्यांदा दोन ठिकाणी फुटली.यात सुमारे चारशे ते पाचशे एकर क्षेत्रातील शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . उभ्या पिकांच्या बरोबर विहीरी,मोटरी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: कात्रज : अल्प उत्पन्नधारकांसाठी लसीकरण मोहिम

यामध्ये यशवंत हळदकर ,बाळकृष्ण हळदकर, उदय भोसले, आनंदा गोधडे, राणोजी गोधडे, भरत गोधडे, दत्तात्रय गोधडे,बाळासो शेणवी,मधुकर शेणवी, रमेश शेणवी, शामराव शेणवी, विश्वास शेणवी,संजय शेणवी,बापू शेणवी, संजय शेणवी, विजय शेणवी, प्रकाश शेणवी, दिलीप शेणवी, राजाराम गोरुले, सुरेश गोरूले,आनंदा गोरुले, जगन्नाथ गोरूले ,नामदेव गोरूले, निवृत्ती गोरूले, एकनाथ गोरुले ,बाळासो गोरुले, शिवाजी पाटील विलास पाटील,बाळकृष्‍ण पाटील ,नामदेव पाटील,आप्पासो पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह आणखीन ४० शेतकऱ्यांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.वारंवार चरफुटी फूटू लागल्यामूळे येथील शेतकऱ्यांना फटका बसतोय.त्यामुळे चर फुटीचा बंदोबस्त करावा.अशी मागणी येथील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.

loading image
go to top