कोल्हापूर : रिक्षाच्या गतीला परिस्थितीचा ‘ब्रेक’

काही प्रवासी रिक्षात बसले की त्यांचे लक्ष मीटरवर असते.दोन-चार रुपयांसाठी वादाचे प्रसंग
आर्थिक गणित जुळवताना रिक्षाचालक मेटाकुटीला कसे येत
आर्थिक गणित जुळवताना रिक्षाचालक मेटाकुटीला कसे येतsakal

‘सौं’च्या यादीपासून सुरुवात.चंबुखडी परिसरातील रिक्षाचालक महेश यांचा दिवस सकाळी सहाला सुरू झाला आणि रिक्षा चकाचक करणे सुरू झाले. रिक्षाला तयार केले आणि स्वतःही तयार झाले.रिक्षात उदबत्ती लावली.देवांच्या प्रतिमेला नमस्कार केला. तोवर घरातून हाक आली.‘‘जातानाच तुझं आडवं येणं सुरू झालं का आजपण? ’असे उत्तर देत असतानाच त्यांच्या सौ बाहेर आल्या.‘‘येताना पोरीची वही,भाजी, दूध आणि पप्पांची औषधं घेऊन या, पैसे नाहीत हे सांगू नका.जादा वेळ गाडी फिरवा नाहीतर राहा तिकडेच, असे बजावले.यादी ऐकून महेश हतबल झाले.धंदा नाही आणि.असे म्हणत डबा घेतला आणि रिक्षा सुरू केली.बहुतेक रिक्षाचालकांच्या दिवसाची सुरुवात अशीच असणार, हा विचार मनात रेंगाळला...

दोन तासानं लागलं वीसचं भाडं...

मंगळवार पेठेत एका थांब्यावर रिक्षाची रांग लागलेली.बाकावर चालक गप्पा मारत बसलेले.तेवढ्यात थांब्यावर आणखी एका रिक्षाची भर पडली. ‘काय मर्दा दिवस असाच जाणार.पावणेदोन तासानं गोखले महाविद्यालय चौकात भाडे लागले तेबी फक्त वीसचं.’ असं सहज बोलून गेला.त्यावर इतर चालकांनीही आपल्यालाही भाडे मिळाले नसल्याचे सांगितले.‘‘एसटी बंद झाल्यापासनं बाहेरगावचं कोणी येत नाही, परीक्षा सुरू आहे. पिक्चरला (चित्रपट)ही गर्दी नाही. उन्हाचा तडाखा सुरू झालाय. आता बसायचं, मे महिना संपूपर्यंत.काय इलाज नाही,’’ असा सूर त्यांनी ओढला.प्रवाशांसाठी त्यांना कितीतरी वेळ वाट पाहावी लागते, याचा अंदाज आला.

शिवभोजनाचा आधार...

सीपीआर चौकातील रिक्षा थांब्यावर शुकशुकाट होता. चालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत होते. दोन-चार चालकांनी डबे काढले... जेवून येतो, असे सांगून टाऊन हॉलचा रस्ता धरला... उभ्या असलेल्या रिक्षाचालकांतील एकजण सहज म्हणाला, ‘मी आज सकाळी लवकर बाहेर पडलो. डबा नाही. त्याला इतरांनी ‘जा की शिवभोजन सुरू आहे’, खाऊन ये जा, तोपर्यंत तुझा नंबर येत नाही..’ असा सल्ला दिला... त्यांच्या आर्थिक तंगीची जाणीव ठळकपणे समोर आली.

मणका, पाठ, मानेचे दुखणे अन् चष्मा

रिक्षाथांब्यावरील मधुकर शिंदे यांच्याबरोबर बोलू लागलो... शारीरिक तंदुरुस्तीबाबत चौकशी केली.... त्यावर त्यांनी या थांब्यावरील सहा चालक पदवीधर असून, नोकरी न मिळाल्याने व्यवसायाकडे वळल्याचे सांगितले... शहर परिसरातील रस्त्यांच्या बिकट अवस्थेचा दणका रिक्षाचालकांना सोसावा लागतो. चाळीशी उलटली की मणका, पाठ, मानदुखी डोके वर काढू लागते... रिक्षा चालविताना सतत काचेतून पाहण्याने... कमी वयातच चष्मा लागतोच लागतो... थांब्यावरील मोजके सोडले तर आम्हा सर्वांना ही दुखणी आहेतच, ते सांगू लागले...

उच्चशिक्षण दूरच...

एका रिक्षा थांब्यावर उभ्या अशोक सूर्यवंशी यांना एक मित्र भेटला... त्याने हाय हॅलो केले. ‘‘काय घरचे कसे आहेत? मुलगा काय शिकतो? हुशार आहे तो... त्यावर सूर्यवंशी यांनी, ‘आमचं कुटुंब रिक्षावर कसबसं चालतं... डॉक्टर, इंजिनिअरिंगला घालणं माझ्या आवाक्याबाहेर आहे... मुलगा हुशार असला तरी पैशाचं सोंग करता येत नाही... मुलगा आयटीआयमध्ये शिकतो... आयटीआय पूर्ण झाले की नोकरी करणार म्हणतो... असं बोलून गेले. रिक्षावरील जेमतेम मिळकतीमुळे मुलांना उच्चशिक्षण देणे काहीसे अवघडच असल्याचे दिसले.

वर्षातून एकदाच कपडे...

बिंदू चौकातील रिक्षा थांब्यावर चालकांत सुरू असलेल्या चर्चेचा कानोसा घेतला... एकाच्या खिशातलं भिशीचं पुस्तक पाहून... एकजण म्हणाला... अरे ‘प्रकाश’ भारी चाललयं की... भिशा भरतोस ते... आम्ही बघ फाटके... त्यावर प्रकाशराव म्हणाले, ‘‘बाबांनो, गल्लीतील भिशीचं पुस्तक आहे. आतापर्यंत बाराशेच साठलेत. दिवाळीपर्यंत पाच-सहा हजार साठायला पाहिजेत. तरच सर्वांचे कपडे तरी घेता येतील... नाहीतर मग काय बायका-पोरांचे कपडे घ्यायचे आणि आपण आपल्या जुन्या खाकीत... आहेच की... आर्थिक गणित जुळवताना रिक्षाचालक मेटाकुटीला कसे येत असतील, याचे हे थेट उदाहरण...

हातउसने अन् कर्जाचा आधार...

काही प्रवासी रिक्षात बसले की त्यांचे लक्ष मीटरवर असते... दोन-चार रुपयांसाठी वादाचे प्रसंग उद्‌भवतात... पण, काही प्रवासी खुशीने मीटरपेक्षा पाच-दहा रुपये जादा देऊन जातात... खासगी वाहनांची संख्या वाढल्याने प्रवासी घटले.... बारा-चौदा तास राबूनही जेमतेम अडीच-तीनशेची मिळकत होते. त्यात इंधन खर्च, मेंटेनन्स खर्च वजा जाता उरलेल्या रकमेतून जगण्याचा मेळ घालणे महाकठीण बनले आहे. त्यातच दरवर्षी रिक्षाचा विमा... पासिंग खर्चासाठी हातउसने अगर कर्जाचाच आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नसते.... त्यामुळे रिक्षाचालकाला डोक्यावर कर्जाचे ओझेच घेऊनच व्यवसाय करावा लागतो...चालक साबळे डोळ्यांत पाणी आणून सांगत होते...

पंधरा वर्षे अन् स्क्रॅपची धास्ती...

जवाहरनगर थांब्यावर सायंकाळी चालक शिवाजी पाटील रिक्षात बसून होते... तेवढ्यात थांब्यावर एक रिक्षा आली. रिक्षातून चालक उतरला आणि रिक्षावर फडके मारू लागला... पाटील म्हणाले, ‘‘बाबा आपली लक्ष्मी आहे. जीवापाड जपतो आपण तिला. पण, शासनाने १५ वर्षांनंतर रिक्षा स्क्रॅप करण्याचा नियम काढला... त्याचा फटका सहन करावा लागणार... आपल्याला पेन्शन ना फंड... नवी रिक्षा अडीच लाखांच्या घरात गेली... कर्ज मिळते, पण हप्ते कसे भरायचे? माझी रिक्षा बघ टकाटक आहे... पण, बिचारी १४ वर्षांची झाली. पुढच्या वर्षी तिला स्क्रॅप करावं लागणार... आमच्या पेठेतील दोघांना नवी रिक्षा घेता आली नाही... ते बिचारे आता सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात... असे सांगून त्यांनी आज काय धंदा झाला का? विचारणा करीत विषय बदलला... रिक्षाचालकांचे रिक्षावरील प्रेम आणि गुंतवणूक यातून दिसते... नवी रिक्षा घेणे शक्य नाही... उतार वयातही दुसरा पर्याय शोधण्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच यातून दिसून आले...

नोकरी न मिळाल्यास रिक्षाचा आधार घेतला जात असे... आता हा व्यवसायच मंदावला आहे... रिक्षांच्या किमती वाढल्या... इंधनाचा खर्च वाढत आहे... तरीही रिक्षाचालक त्याला टक्कर देत ठामपणे उभा आहे...

जीवाभावाची नाती एकवेळ साथ सोडून देतील. पण, ‘ती’ साथ सोडायची नाही. ‘ती’ कुटुंबाचा एक घटक आहे. रोजच्या झगडण्याला एकवेळ आम्ही थकून जाऊ... पण, ‘ती’ हार मानणार नाही... तिच्या जीवावर दोन वेळची भाकरी मात्र व्यवस्थित मिळाली... त्यांची ‘रिक्षा’ ही त्यांची लक्ष्मीच आहे... सध्या डबघाईला आलेल्या रिक्षा व्यवसायाने चालकांना रोज कसं झगडावं लागतं... तुटपुंज्या मिळकतीवर कुटुंबांचं ओझं कसं पेललं जातं... त्यांचं रोजचं जगणं कसं असतं... दिवस बदलतील या आशेवर... किंवा दुसरा पर्याय नाहीच म्हणून सुरू असलेला हा व्यवसाय जवळून अनुभवताना... रिक्षाचालकांची रोजची लढाई नजरेस पडते...जवाहरनगर थांब्यावर सायंकाळी चालक शिवाजी पाटील रिक्षात बसून होते... तेवढ्यात थांब्यावर एक रिक्षा आली. रिक्षातून चालक उतरला आणि रिक्षावर फडके मारू लागला... पाटील म्हणाले, ‘‘बाबा आपली लक्ष्मी आहे. जीवापाड जपतो आपण तिला. पण, शासनाने १५ वर्षांनंतर रिक्षा स्क्रॅप करण्याचा नियम काढला... त्याचा फटका सहन करावा लागणार... आपल्याला पेन्शन ना फंड... नवी रिक्षा अडीच लाखांच्या घरात गेली... कर्ज मिळते, पण हप्ते कसे भरायचे? माझी रिक्षा बघ टकाटक आहे... पण, बिचारी १४ वर्षांची झाली. पुढच्या वर्षी तिला स्क्रॅप करावं लागणार... आमच्या पेठेतील दोघांना नवी रिक्षा घेता आली नाही... ते बिचारे आता सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात... असे सांगून त्यांनी आज काय धंदा झाला का? विचारणा करीत विषय बदलला... रिक्षाचालकांचे रिक्षावरील प्रेम आणि गुंतवणूक यातून दिसते... नवी रिक्षा घेणे शक्य नाही... उतार वयातही दुसरा पर्याय शोधण्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच यातून दिसून आले...

नोकरी न मिळाल्यास रिक्षाचा आधार घेतला जात असे... आता हा व्यवसायच मंदावला आहे... रिक्षांच्या किमती वाढल्या... इंधनाचा खर्च वाढत आहे... तरीही रिक्षाचालक त्याला टक्कर देत ठामपणे उभा आहे...

जीवाभावाची नाती एकवेळ साथ सोडून देतील. पण, ‘ती’ साथ सोडायची नाही. ‘ती’ कुटुंबाचा एक घटक आहे. रोजच्या झगडण्याला एकवेळ आम्ही थकून जाऊ... पण, ‘ती’ हार मानणार नाही... तिच्या जीवावर दोन वेळची भाकरी मात्र व्यवस्थित मिळाली... त्यांची ‘रिक्षा’ ही त्यांची लक्ष्मीच आहे... सध्या डबघाईला आलेल्या रिक्षा व्यवसायाने चालकांना रोज कसं झगडावं लागतं... तुटपुंज्या मिळकतीवर कुटुंबांचं ओझं कसं पेललं जातं... त्यांचं रोजचं जगणं कसं असतं... दिवस बदलतील या आशेवर... किंवा दुसरा पर्याय नाहीच म्हणून सुरू असलेला हा व्यवसाय जवळून अनुभवताना... रिक्षाचालकांची रोजची लढाई नजरेस पडते...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com