Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चप्पलची गुणवत्ता टिकवणे गरजेचे ; ओंकार धर्माधिकारी

क्लस्टरच्या मृगजळात चर्मकार कारागीर उपेक्षित
Kolhapuri Chappal
Kolhapuri Chappalsakal

कोल्हापूर : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी क्लस्टरची घोषणा झाली. मात्र, प्रत्यक्ष कोल्हापुरी चप्पल बनवणारा कारागीर क्लस्टरपासून कोसो मैल लांब आहे. तो आर्थिक गर्तेत सापडलेला असून,

त्याच्यापर्यंत या क्लस्टरचे लाभ पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलचे क्लस्टर हे केवळ या उद्योगातील प्रस्थापित आणि व्यापारी यांनाच लाभदायी ठरणार आहे. चप्पल बनवणाऱ्या कागिराला यामध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.

आकर्षक आणि मजबूत असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलची भुरळ अनेकांना पडते. कोल्हापुरात येणारा पर्यटक ही चप्पल खरेदी करतोच.

आता परराज्यात आणि परदेशातही ही चप्पल विकली जात आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने क्लस्टरची घोषणा केली; पण प्रत्यक्षात या उद्योगातील मूलभूत अडचणी सोडवण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

कोल्हापुरी चप्पल बनवणारा कारागीर हा या उद्योगाचा कणा आहे. मात्र, सध्या तोच आर्थिक गर्तेत अडकलेला आहे. शहरातील कोल्हापुरी चप्पल विक्री करणाऱ्यांना तो चप्पल बनवून विकतो.

काही कारागीर चप्पल बनवण्याच्या कारखान्यातच काम करतात. काही जणांना दिवसाकाठी हजेरी मिळते तर काहीजण अंगावर काम घेतात. चप्पलाची वेणी, बंध, कलाकुसर यामध्ये या कारागिरांचा हातखंडा आहे.

Kolhapuri Chappal
Kolhapur : आदमापूर येथे जागरानिमित्त भाकणूक ; लाखो भाविकांना महाप्रसादाचा लाभ

ज्यावेळी या कारागिरींना आर्थिक बळ मिळून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतील तेव्हाच क्लस्टर करण्याचा हेतू साध्य होईल. क्लस्टरचा उपोयग करून घेण्यासाठी त्यांना भांडवलाची गरज आहे. मात्र, बँका त्यांना पतपुरवठा करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यातील बहुतांशीजण सावकारी कर्जात अडकल्याचीही चर्चा आहे.

...अन्यथा दिखाऊ चप्पल विकल्या जाण्याचा धोका

क्लस्टरमध्ये केवळ सुविधा देण्यात येतील. मात्र, यातून ज्या कोल्हापुरी चप्पल तयार होतील त्यांची गुणवत्ता जीआय मानांकनाप्रमाणे असणार का? क्लस्टरमध्ये चप्पलची गुणवत्ता चाचणी करण्याची सुविधेचा समावेश आहे का? अन्यथा कोल्हापुरी चप्पल या ब्रँडखाली दिखाऊ चप्पल विकल्या जाण्याचा धोका आहे.

Kolhapuri Chappal
Kolhapur : आजपासून ‘छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com