कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारात आता ‘मुश्रीफराज’ आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) स्वतः जिल्हा बॅंकेत अध्यक्ष आहेत. आता जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) मध्ये त्यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ (Navid Mushrif) अध्यक्ष झाले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवून सहकारात ‘मुश्रीफराज’ आल्याचे अधोरेखित झाले आहे. राजकारणात सहकाराचा फायदा उठवून घराणेशाही कायम ठेवल्याचे या निमित्ताने पुन्हा दिसून आले.