
कोल्हापूर : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लिपिकासह पत्नीवर गुन्हा
कोल्हापूर: बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील तत्कालीन लिपिकासह त्याच्या पत्नीवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. सतीश गणपतराव सूर्यवंशी (रा. दिंडेनगर हौसिंग सोसायटी, पाचगाव) आणि त्यांची पत्नी अर्चना सूर्यंवंशी अशी त्यांची नावे आहेत. मालमत्तेच्या चौकशीबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी आज सांगितले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशीजिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात सतीश सूर्यवंशी तत्कालीन लिपिक होते. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी व्हावी, यासंबधी पोलिस उपायुक्त (लाचलुचपत प्रतिबंक विभाग पुणे) यांच्याकडून कोल्हापूर विभागाला आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची खुली चौकशी पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली.
Web Title: Kolhapur Crime Agains Unaccounted Property Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..