Tue, March 21, 2023

Kolhapur : कालव्यात बेवारस मृतदेह आढळला, घात की अपघात? तपास सुरु
Published on : 11 March 2023, 8:36 am
हुपरी(जि. कोल्हापूर) : येथील जवाहर साखर कारखाना परिसरातील ज्योतिर्लिग मंदिराच्या पिछाडीस असलेल्या डाव्या कालव्यात मृतदेहासह चारचाकी मोटार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना आज शनिवारी (ता.११)सकाळी उघडकीस आली.
हा अपघात की घातपात याची जोरदार चर्चा सुरू आहे. मृत व्यक्ती हुपरी येथील असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. कालव्यातील पाण्यात चारचाकी मोटार (क्र. एम एच २२ इ टी १७६२) पडल्याचे दिसून आले.
पोलीसांनी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली. त्यावेळी मोटारीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी पथकासह भेट देऊन घटनेचा तपास सुरु केला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.