Kolhapur Drought : उर्वरित सहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा; जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव; सोसायट्यांचे मार्जिन वाढवण्याची मागणी

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution : कोल्हापूर जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत करण्यात आला.
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution

esakal

Updated on: 

कोल्हापूर, : जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव आजच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या ८८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी सोसायट्यांचे मार्जिन वाढवा, कर्नाटकातील बॅंकांचा आदर्श घेऊन १२ टक्‍क्यांचे कर्ज तीन टक्के करा, शैक्षणिक कर्जाची मर्यादा वाढवून व्याज दर कमी करा, सीमाभागातील ॲग्रिस्टॅग नोंदणीसाठी प्रयत्न करा, अशीही मागणी सभासदांनी केली.

महासैनिक दरबार सभागृहात आज दुपारी सभा झाली. अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. सभेत अध्यक्ष मुश्रीफ यांनी पुढे निवडणूक असल्याचे सांगून बॅंकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ए.आय. टेक्नॉलॉजीचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवा, सोलर योजनाचा फायदा घ्या, असेही आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com