Gokul chairman election postponed in Kolhapur
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीसाठी आज (ता. २९) सकाळी ११ वाजता गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प कार्यालयात आयोजित केलेली सभा कोरमअभावी तहकूब (Gokul chairman election postponed in Kolhapur) झाली. महायुतीचे १२ संचालक सभेला गैरहजर राहिल्याने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गोकुळच्या नव्या अध्यक्षांची निवड आज होण्याची शक्यता कमी झाली आहे.