Good News | थेट 'पाईपलाईन'च्या कामाला सोळांकुरात सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : Good News थेट 'पाईपलाईन'च्या कामाला सोळांकुरात सुरुवात

कोल्हापूर : Good News थेट 'पाईपलाईन'च्या कामाला सोळांकुरात सुरुवात

सोळांकूर : कोल्हापूर शहरासाठीच्या थेट पाईपलाईन योजनेच्या येथील पाईपलाईन टाकण्याचा अडसर दूर झाला आहे. गावातील सोळांकूर ग्रामीण रुग्णालयासमोरून आज पाईपलाईनसाठी खोदाईचे काम सुरू झाले. महापालिका प्रशासन आणि सोळांकूर ग्रामपंचायत यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पुढचे पाऊल पडले आहे.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरविण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यातील महत्त्वाचा अडथळा सोळांकूर गावातील पाईपलाईन होता. या योजनेची पाईपलाईन गावातून टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. आता या गावातून पाईपलाईन टाकण्यास प्रारंभ झाला.

हेही वाचा: दोन्ही बाजूंकडून चर्चेसाठी चाचपणी

सुमारे ५२ किलोमीटरची पाईपलाईन आहे. सोळांकूर येथे १४०० मीटर पाईपलाईनचे काम बाकी आहे. त्यापैकी ४०० मीटर काम गावातून आहे. या कामास आता सुरवात झाली असून, ते जानेवारीअखेरीपर्यंत संपेल.

महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी तथा उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सोळांकूरचे सरपंच आर. वाय. पाटील, सदस्यांशी गावात जाऊन चर्चा केली होती. त्यातून तोडगा निघाल्यानंतर ग्रामस्थांनी काम पूर्ण करण्याची परवानगी दिली.

loading image
go to top