

कोल्हापूर: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तीनही उपसा केंद्रांना महापुराचा विळखा पडल्याने चार दिवसांपासून ते बंद आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठाही बंद होता. सोमवारी रात्री बालिंगा केंद्रातून (Balinga center)पाणी उपसा सुरू करण्यात आला. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे (Kadambari Balkvade) यांनी बालिंगा व नागदेववाडी Nagdevwadi)पाणी उपसा केंद्रांना भेट दिली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. बालिंगा केंद्रातील उपसा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिंगणापूर येथीलही पाणी उपसा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना जलअभियंत्यांना प्रशासकांनी दिल्या.
पुराचे पाणी ओसरू लागल्याने कर्मचाऱ्यांनी रविवारी तातडीने युद्ध पातळीवर पंपिंग स्टेशनमधील मोटारी बाहेर काढल्या. गोकुळ शिरगांव एमआयडीसीमध्ये त्या मोटारी हिटिंगसाठी पाठविल्या होत्या. त्या मोटारी सोमवारी दुपारी मिळाल्याने सायंकाळपर्यंत बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये बसविल्या. रात्रीच पाणी उपसा सुरू केला. त्यामुळे मंगळवारी शहरातील ए, बी, सी, डी वॉर्डमध्ये पाणी पुरवठा होणार आहे. हे काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल डॉ. बलकवडे यांनी टीमचे कौतुक केले
७० टँकर उपलब्ध
महापालिकेला पुणे महानगरपालिकेने १७ पाण्याचे टँकर पाठवले आहेत. याबरोबरच सांगली, सोलापूर, सातारा येथून ही पाण्याचे टँकर्स उपलब्ध झाले आहेत. सर्व मिळून ७० टँकर महापालिकेला उपलब्ध झाले असून उद्या सकाळपासून प्रत्येक भागाला एक टॅंकर देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मिळालेले सर्व टॅंकर मोठ्या क्षमतेचे असल्याने या टँकरमधून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा विश्वास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महापालिकेने त्यासाठी विभागीय कार्यालय स्तरावर नियोजन केले असून, सकाळपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल.
महापुरामुळे पंचगंगा नदीकाठावरील सर्व पाणी उपसा केंद्रे पाण्याखाली गेल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद असून शहरात पाण्यासाठी सर्वत्र धावाधाव सुरू आहे. मिळेल त्या वाहनातून आणि मिळेल तेथून पाणी मिळविण्यासाठी महिला आणि नागरिकांची धावपळ सुरू आहे. महापालिकेने पाण्यासाठी टॅंकरची व्यवस्था केली आहे; पण टँकरने पाणीपुरवठा करण्यास मर्यादा आहेत. पाणी मिळवण्यासाठी आता धडपड सुरू आहे.
खासगी मालकीच्या कूपनलिकांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. दाट वस्तीमध्ये टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे; कळंबा फिल्टर हाऊस आणि कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाण्याचे टँकर भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्याचबरोबर खासगी टॅंकरलाही मोठी मागणी आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाण्याचे टॅंकर आणि पाणी वाहतूक करणारी वाहने दिसत आहेत.
खासगी टँकरवाल्यांची चलाखी
महापालिकेने स्वत:च्या टँकरव्यतिरिक्त इतर टँकर भाड्याने घेतले आहेत. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था, मंडळे या सर्वांना कळंबा फिल्टर हाऊस येथून मोफत पाणी भरून दिले जात आहे. याशिवाय या ठिकाणी काही खासगी टँकरवालेही पाणी भरतात; परंतु काही खासगी टँकरवाले महापालिकेच्या केंद्रातून पाणी भरून घेऊन बाहेर विकत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या टँकरवाल्यांना महापालिका मोफत पाणी भरू देत असल्याने कोणत्याही नागरिकांनी त्यांना पैसे देऊ नयेत, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.