कोल्‍हापूर : पन्हाळ्यावरील ऐतिहासिक ठेवा कुलूपबंद

तोफगोळ्यांसह विविध वस्तू बंदिस्त
पौराणिक, ऐतिहासिक वस्तू सापडतात
पौराणिक, ऐतिहासिक वस्तू सापडतातsakal

पन्हाळा: स्वच्छता करताना येथे अनेक पौराणिक, ऐतिहासिक वस्तू सापडतात. तेवढ्यापुरता त्यांचा बोलबाला होतो आणि पुरातन वस्तू या सबबीखाली पुरातत्त्व खाते त्या कुलूपबंद करते. पुन्हा त्या अमूल्य वस्तू ना नागरिकांना दिसतात, ना पर्यटकांना. लोक किल्ला पाहायला येतात, पण त्यांना काळाच्या ओघात जमीनदोस्त होणाऱ्या इमारती पलीकडे काहीही पाहायला मिळत नाही.

पन्हाळगड फक्त गड नाही, किल्ला नाही, फक्त थंड हवेचे ठिकाण नाही, तर इथे अनेक राजवटी नांदल्या आहेत. प्रत्येक राजवटीने आपले काही अवशेष ठेवले आहेत, कालानुरूप आणि राजवटीनुरूप गडाची नावेही बदलत गेली आहेत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजेंनी इथे काही महिने मुक्काम केला आहे. गडाची दुरुस्ती केली आहे.

पावनगड बांधला आहे. त्यावेळच्या आणि नंतरच्या काळातील काही वस्तू इथे सापडतात, पण पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे त्यांचे दर्शन इतिहासप्रेमींना होत नाही. पन्हाळा हा पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. साहजिकच त्यांच्या परवानगीशिवाय काही बदल करता येत नाही. खोदकाम करता येत नाही. मध्यंतरी पावनगडावर दगडी तोफगोळ्यांचा साठा सापडला. तीन दरवाजा परिसरात तटबंदीत घुसलेला धातूचा तोफगोळा सापडला. गेल्याच आठवड्यात स्वच्छता करणाऱ्या पुसाटी परिसरात लोखंडी तोफगोळा सापडला, पण हे सर्व तोफगोळे पुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांनी धर्मकोठी इमारतीत कुलूपबंद केले.

ही प्रसिद्ध इमारतही सध्या इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी ४४ वर्षे पायपीट करून, स्वतःचा खर्च घालून ऐतिहासिक तलवारी तोफा, नाणी, पंचांगे, कागदपत्रे, जुनी हस्तलिखिते जमवली. इतिहासप्रेमींना त्याचा अभ्यास करता यावा म्हणून १९६४ ला शिवसंस्कृती मंडळ स्थापन करून त्यात या वस्तू ठेवल्या. त्याचा लाभ अनेकांनी घेतला, पण त्यांच्या पश्चात हे संग्रहालय ही नामशेष झाले. त्यांनी शोधलेल्या वीर शिवा काशीद, कोल्हापूरचे पहिले छत्रपती शिवाजी, छत्रपती राजाबाई, जखूबाई तेलीण, यशवंतराव थोरात या समाध्या ही दुर्लक्षित आहेत. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी धर्मकोठीत मु. गो. नीं शोधलेल्या तसेच अलीकडच्या काळात सापडणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय केले आणि ते माहितीसाठी खुले ठेवले तर पर्यटकांच्या माहितीत भर पडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com