esakal | Kolhapur : हनी ट्रॅपच्या विळख्याला वेळीच रोखा
sakal

बोलून बातमी शोधा

हनी ट्रॅप

इचलकरंजी : हनी ट्रॅपच्या विळख्याला वेळीच रोखा

sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकलेल्या एकाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली. हनी ट्रॅपच्या जाळ्यात हातात स्मार्टफोन असणारा तरुण, प्रौढ नागरिकही सापडत चालले आहेत. शहरानजीक एका यंत्रमाग कामगाराने हनी ट्रॅपला कंटाळून आत्महत्या केल्याने तरुणाई भीतीच्या छायेत आहे. ‘हनी ट्रॅपच्या विळख्यात तरुणाई’ या मथळ्याखाली महिन्यांपूर्वी ‘सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून याला वाचा फोडली होती. हनी ट्रॅपला बळी पडून एकाने जीवनच संपविल्याने पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

वकील, डॉक्टर, उद्योजक, इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी होऊ पाहणाऱ्या तरुणाईला हनी ट्रॅपचे ग्रहण लागले आहे. इचलकरंजीत हनी ट्रॅपचा विळखा इतका घट्ट झाला आहे की कॉलेज बंद असल्याने घरी असलेली तरुणाई सहज बळी पडत आहे. तरुण बदनामीच्या भीतीने पुढे येत नसल्याचे चित्र आहे. अनेकजण आत्महत्येसारख्या टोकाचे पाऊलही उचलताना दिसले. मात्र यांना वेळीच रोखले. पोलिस यंत्रणेपुढे हनी ट्रॅपचा विळखा सैल करण्याचे आव्हान आहेच; मात्र आता याकडे सतर्कतेने पाहून गंभीर होण्याची वेळ आहे.

हेही वाचा: बालेवाडी : सतरा महिन्या नंतर वाजल्या शाळेच्या घंटा

शहरातील हनी ट्रॅपमुळे झालेल्या एका आत्महत्येमुळे पालकांची चिंता वाढली आहे. आपल्या मुलांना हनी ट्रॅपपासून दूर ठेवण्यासाठी चिंताग्रस्त पालकांची मागणी वाढली आहे. थेट जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय तरुण घेत असल्याने प्रबोधनाची गरज आहे. सावित्रीच्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी जसे निर्भया पथक आहे तसे आता हनी ट्रॅपच्या धोक्याच्या वळणावर तरुणात जनजागृतीची गरज आहे. आज ही गोष्ट पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही तर तरुण बळी पडतील आणि हनी ट्रॅपची गुन्हेगारी समाजात दृढपणे पसरण्याची दाट शक्यता आहे.

हे अपेक्षित

  • शाळा, महाविद्यालयात जागृती

  • पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार पेटी

  • पालक, विद्यार्थ्यांशी संवाद

  • तक्रारीनंतर सखोल तपास

  • सायबर गुन्ह्यांवर वेळीच नियंत्रण

क्षणिक सुखासाठी तरुणांनी मर्यादा सोडू नयेत. समक्ष विचारांची देवाण-घेवाण करत नाही, तोपर्यंत सोशल मीडियावर इतरांशी संपर्क वाढवू नये. कोणी फसवत असेल तर पुरावे जवळ ठेवावेत. याबाबत निसंकोचपणे पोलिसात तक्रार द्यावी. तरच वेळीच हनी ट्रॅपसारखे प्रकार रोखले जातील.

-जयश्री गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक

loading image
go to top