कोल्हापूर : पुराची भरपाई न देण्याचा निकष त्वरित रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 mahapur

कोल्हापूर : पुराची भरपाई न देण्याचा निकष त्वरित रद्द करा

कोल्हापूर : नियमितपणे कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी म्हणून ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. परंतु ५० हजार सानुग्रह मिळालेल्या शेतकऱ्यांना पुराची नुकसान भरपाई न देण्याचा निर्णय पुनर्विचार करून हा निकष त्वरित रद्द करावा, अशा आशयाचे निवेदन पूरग्रस्त समितीतर्फे सहकार निबंधकांना निवेदन दिले, शिष्टमंडळाचे नेतृत्व बाजीराव खाडे यांनी केले.

महात्मा फुले कृषी कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला पण नियमित कर्ज भागविणान्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नव्हता. सानुग्रह अनुदान कर्जमाफी योजनेत ठराविक कालावधीतच कर्ज परतफेड करण्याचा लावलेला निकष रद्द करून कर्जमाफी न मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळावा अशी मागणीही केली. सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीचा हा निर्णय घेतला.

असला तरी पूर नुकसान भरपाई मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये अनुदानाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा शिष्टमंडळात केवलसिंग रजपूत, बी. आर. पाटील, उत्तम काबोरे, मच्‍छिंद्र मडके, एन. डी. खाडे, विनोद यादव, बलवंत खाडे, बी. डी. खाडे, सदाशिव खाडे, विश्वास चौगले, श्रीकांत पाटील, सदाशिव पाटील, भिकाजी पाटील, कृष्णात कुंभार, पिराजी मेथे, सागर शिर्के, विजय गायकवाड आदींचा समावेश होता.

Web Title: Kolhapur Immediately Cancel Criteria Non Payment Of Floods

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..