
कोल्हापूर : नागरिकांना पुराच्या वेळी नदीच्या पाण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती योग्यवेळी मिळावी, या हेतूने जलसंपदा विभागाकडून निटवडे (ता. करवीर) येथे सरिता मापन केंद्राची (Sarita Measurement Center) उभारणी झाली; पण कासारी नदीवरील (Kasari River) यवलूज-पोर्ले बंधाऱ्यानजीक असणाऱ्या केंद्रातील क्रेन आणि पाळण्यांसह इतर यंत्रसामग्रीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक वर्षे ही यंत्रणा बंद आहे. फक्त पाण्याची पातळी मोजण्यापलीकडे येथे काहीही काम होत नाही. त्यामुळे धोक्याच्या आगाऊ सूचना सांगण्यात अडचण येत आहे.