esakal | कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धा होणार....
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur mahapor Kesari wrestling competition will be start

महापौर केसरी कुस्ती तसेच महापौर चषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धा होणार....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - महापौर केसरी कुस्ती तसेच महापौर चषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी नियोजनाची बैठक आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापौरांनी कुस्ती स्पर्धा मार्च अखेर होईल, असे सांगताना त्यासाठी नेमका किती खर्च येईल, त्याचे अंदाजपत्र तालीम संघाने द्यावे, अशी त्यांनी सूचना केली. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे अंदाजपत्रक मिळाल्यानंतर पदाधिकारी व प्रशासनाशी चर्चा करुन स्पर्धेची तारीख निश्‍चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. केएसएने खर्चाच्या अंदाजपत्रक द्यावे, स्पर्धा राज्यस्तरीय की राष्ट्रीय स्तरावर घ्यायची यासंबंधी सोमवारपर्यंत निर्णय देऊ, असेही त्यांनी सांगितले.

 किताबाची लढत देशातील दोन नामवंत मल्लात होईल

मालमत्ता अधिकारी सचिन जाधव म्हणाले, ‘‘महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०१७ मध्ये घेतली होती. यावर्षी अर्थसंकल्पात आठ लाखाची तरतूद आहे. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेसाठी १० लाखांची तरतूद आहे.’’ तालीम संघातर्फे   ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘‘महापालिकेच्या महापौर केसरी स्पर्धा  ५७, ६१,६५,७४,७६ व ८६ किलो वजनगटात होईल. महिला कुस्ती स्पर्धा ४५, ५५ व ६० किलो वरील गटात होईल.  किताबाची लढत देशातील दोन नामवंत मल्लात होईल. स्पर्धेसाठी २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.’’

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, ‘‘महापौर चषक स्पर्धा कोल्हापूरला शोभेल अशी करु.’’ केएसएच्या वतीने अमर सासने यांनी स्पर्धेचे अंदाजपत्रक दोन दिवसात सादर करु, असे सांगितले. यावेळी हिंदकेसरी दिनानाथसिंह, उप-महापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती शोभा कवाळे, गटनेता सुनिल पाटील, नगरसेवक अशोक जाधव,  सचिन पांडव, गणेश सकट, तालीम संघाचे दीनानाथ सिंह, अशोक पोवार, अमर सालपे, नामदेव मोळे, संभाजी पाटील, विष्णू जोशीलकर, संतोष पोवार, नंदकुमार जांभळे, प्रवीण काळे आदी उपस्थित होते.

loading image