kolhapur : महापुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहावे

अमल महाडिक; वळिवडेत आढावा बैठक
kolhapur
kolhapursakal

गांधीनगर : २०१९ आणि २०२१ चा महापुराचा अनुभव लक्षात घेता सर्वांनी सतर्क राहावे, अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. वळिवडे (ता. करवीर) येथे त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत महाडिक यांनी सद्यःस्थितीचा आढावा घेतला. तसेच तरुणांचा एक गट तयार करून प्रशासनाच्या समन्वयाने कोणकोणत्या उपाययोजना अवलंबायच्या, याबाबतच्या सूचनाही दिल्या. महाडिक म्हणाले, ‘राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजनांची तरतूद केली आहेच; पण याव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत कशाचीही गरज पडल्यास मी तुमच्यासोबत निश्चितपणे उभा राहीन.

यावेळी सरपंच अनिल पंढरे, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले, विक्रम मोहिते, गोपालदास दर्डा, विजय खांडेकर, प्रशांत जाधव, योगेश खांडेकर, बाबासाहेब पाटील, वैजनाथ गुरव, उदय पोवार, उदय पाटील, शशी खांडेकर, धनाजी शिंदे, अरुण शिंदे, सनी मोरे, शंकर शिपेकर, राजेंद्र मोरे, बाळासो पाटील, जितेंद्र कुसाळे, रावसाहेब दिगंबरे, प्रदीप खांडेकर, विशाल जगदाळे, राजेंद्र रेपे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com