
पश्चिम महाराष्ट्रातील सैनिकांसाठी रेल्वे खात्याची गुड न्यूज
कोल्हापूर: येथील रेल्वे स्थानकातून आज पासून दोन रेल्वे गाड्या नव्याने सोडण्यात येणार आहेत. यापैकी एक गाडी आठवड्यातून दोनवेळा अमृतसरला तर एक गाडी अहमदाबादला सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.(kolhapur-maharashtra-sampark-kranti-expressis-start-in-today)
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सैनिकांसाठी अमृतसरला जाणारी गाडी सोईची ठरणार आहे. या गाडीचे नाव महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस असे आहे. ही गाडी कोल्हापुर ते अमृतसर या दरम्यान आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. प्रत्येक सोमवारी आणि गुरूवारी कोल्हापुरहून सकाळी सात वाजता अमृतसरकरकडे रवाना होणार आहे. दुसऱ्या दिवशी ही गाडी अमृतसरला सायंकाळी सव्वा पाच वाजता पोहचणार आहे. याशिवाय गाडीसाठी पैंट्री कारचीही सोय आहे. गाडीमुळे सैनिकांशिवाय अन्य व्यावसायिकांचीही चांगली सोय झाली आहे.
अहमदाबादहून पुण्याला आठवड्यातून एकवेळा येणारी गाडीही कोल्हापूरपर्यंत आणली आहे. ही गाडी कोल्हापूर ते पुणे अशी दाखवली आहे. यासाठी ०१०४९ आणि ०१०५० हा वेगळा नंबरही दिला आहे. अहमदाबादहून आठवड्यातून एकवेळा पुण्यास येणारी गाडी कोल्हापूरपर्यंत नेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विनंतीमुळे घेतला आहे.