सोमवारपासून कोल्हापूर शहरात व्यापार सुरू

ललित गांधी, जोशी; राजारामपुरी व महाद्वार असोसिएशनचा निर्णय
सोमवारपासून कोल्हापूर शहरात व्यापार सुरू
Updated on: 

कोल्हापूर : अडीच महिन्यांच्या लॉकडाउनमुळे (lockdown) व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता ही स्थिती सहन करणे शक्य नाही. त्यामुळे सोमवार (ता. २८) पासून राजारामपुरी (rajaramouri) व महाद्वार रोडवरील व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ललित गांधी व शामराव जोशी यांनी दिली. राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस रणजित पारेख, विजय येवले व महाद्वार रोड असोसिएशनचे पदाधिकारी, रेडिमेड गारमेंट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम निसार यांच्यासह विविध व्यापारी उपस्थित होते.

सोमवारपासून कोल्हापूर शहरात व्यापार सुरू
PHOTO - जाणून घ्या; कोणत्यावेळी काय खावे, काय खाऊ नये

सलग दुसऱ्या वर्षीचा लॉकडाउन जीवघेणा ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. लॉकडाउनच्या काळात नियमांचे कारण दाखवून पालिकेचे काही अधिकारी अरेरावी करतात याबाबतही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत दुकाने तत्काळ सुरू करण्याचा आग्रह धरला.व्यापाऱ्यांना लॉकडाउनच्या काळातील घरफाळा माफ करावा, लाईट बिल माफ करावे, अशा मागण्याही मांडल्या.

चर्चेत प्रताप पवार, अनिल पिंजाणी, गजानन पवार, स्नेहल मगदूम, राजकुमार चुग, दीपक पुरोहित, रमेश कारवेकर, महेश जेवरानी, डॉ. गुरुदत्त म्हाडगूत, मधुकर डोईफोडे यांनी सहभाग घेतला. शामराव जोशी यांनी महाद्वार परिसरातील व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या.
ललित गांधी यांनी सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर सरकार, स्थानिक प्रशासन, पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना व्यापाऱ्यांची भूमिका पटवून दे. शासनाने सोमवारपासून किमान ९ ते ४ या वेळेत दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तर सामूहिक प्रतिकार

शासनाने मागणीवर तत्काळ निर्णय न घेतल्यास सोमवारपासून राजारामपुरी व महाद्वार रोड असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी, तसेच रेडिमेड गारमेंटचे व्यापारी, शिवाजी स्टेडियम परिसरातील व्यापारी निकष पाळून व्यापार सुरू करतील, असा निर्णय जाहीर केला. प्रशासनाने व्यापाऱ्यांची अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे. जर काही कारणांनी कारवाईचा प्रयत्न झालाच तर व्यापारी सामूहिकपणे प्रतिकार करतील व कारवाईला सामोरे जातील, असा इशारा ललीत गांधी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com