Jyotiba Temple : जोतिबा डोंगराला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'हा' मुख्य मार्ग बनलाय धोकादायक!

सध्या रस्त्यावरून लोखंडी खांब लावून मध्य भागातून दुचाकीसाठी जागा करून वाहतूक सुरु आहे.
Jyotiba Temple Kolhapur
Jyotiba Temple Kolhapuresakal
Updated on
Summary

गत जुलैलाच संभाव्य धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे.

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरचा (Jyotiba Temple Kolhapur) मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाण्याचा टाका भागातील रस्ता पावसामुळे खचण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून गत पावसाळ्यापासूनच रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

Jyotiba Temple Kolhapur
Koyna Dam Update: महापुराची धास्ती! महाराष्ट्राचं 'आलमट्टी'वर तर कर्नाटक शासनाचं 'कोयने'वर लक्ष्य; दोन्ही धरणांत किती आहे साठा?

सध्या रस्त्यावरून लोखंडी खांब लावून मध्य भागातून दुचाकीसाठी जागा करून वाहतूक सुरु आहे. मात्र चारचाकी वाहनांसह सर्व इतर वाहतूक गायमुख तलाव मार्गे सुरु आहे. कुशिरे जोतिबा रस्त्यावर जॉकवेलच्या परिसरात रस्ता खचू लागला आहे.

रस्त्याकडेला मोठा खड्डा पडला होता. तो दोन दिवसांपूर्वी बुजवला आहे, परंतु आजच्या पावसाने आणखी खड्डा पडला आहे. मुख्य मार्ग असल्याने वाहनचालकांना रात्री धोका आहे. पाण्याचा टाका भागात पाच वर्षांपासून रस्ता तुटून जातो. गतवर्षीही रस्ता मोठ्या प्रमाणात खचला होता.

Jyotiba Temple Kolhapur
Konkan Rain : महापुराचा धोका! इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर रत्नागिरीतील 571 कुटुंबांमधील 1700 लोकांचं स्थलांतर

गत जुलैलाच संभाव्य धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. तीर्थक्षेत्र भीमाशंकरजवळ वळणावर लोखंडी खांब लावून हा रस्ता बंद केला आहे. जोतिबा डोंगरावर सतत दाट धुके थंडी तसेच पावसाची रिपरिप असते. पाण्याचा टाका भागात पाणी साचत असल्याने दलदल होते.

Jyotiba Temple Kolhapur
Radhanagari Dam : तीन तासांत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता

परिणामी, रस्ता तुटून जातो. येथे सलग पाच वर्षांपासून रस्ता तुटत आहे. त्यामुळे या रस्त्याची तज्ज्ञांमार्फत पाहणी करून भूगर्भ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. जोतिबा डोंगरचा कायमस्वरूपी मुख्य रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com