राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोल्हापुरात आता 92 नगरसेवक

२०११ च्या जनगणनेच्या आधारावर महापालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोल्हापुरात आता 92 नगरसेवक
Updated on
Summary

२०११ च्या जनगणनेच्या आधारावर महापालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे.

कोल्हापूर : मुंबई वगळून कोल्हापूरसह अन्य महापालिकांच्या सदस्यांच्या संख्येत ११ ने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ८१ वरून ९२ होणार आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारावर महापालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे.

"महापालिकेतील सदस्यसंख्या ८१ वरून ९२ होण्याच्या निर्णयाचा फायदा उपनगरातील प्रभागांना होणार आहे. भौगोलिकदृष्ट्या या प्रभागांचा विस्तार झालेला असतो; पण एका नगरसेवकाला काम करताना मर्यादा आणि अडचणीही येत होत्या. आता मात्र त्रिस्तरीय प्रभाग झाल्याने तिघांना काम करणे सोपे होणार आहे. या निर्णयाचा फायदा उपनगरांना मोठ्या प्रमाणात होईल."

- शारंगधर देशमुख, माजी स्थायी सभापती, महापालिका

"त्रिस्तरीय प्रभागरचनेमुळे प्रत्येक प्रभागात कामाचे तीन तेरा होणार आहेत. कामावरून आणि श्रेयवादावरून नगरसेवकांच्यात भांडणे लावण्याचा हा प्रयत्न आहे. नेत्यांच्या सोयीसाठी आणि नेत्यांचे महत्त्व वाढवण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. एका प्रभागात तीन पक्षांचे तीन नगरसेवक निवडून आले तर कोण कोणाला कामे करू देणार नाहीत."

- सत्यजित कदम, माजी गटनेते, ताराराणी आघाडी

इचलकरंजीत वाढणार ११ नगरसेवक

इचलकरंजी : येथील पालिकेत सदस्यसंख्या तब्बल ११ ने वाढून ६२ वरून ७३ वर पोहोचणार आहे. प्रभागांची संख्या ३६ होईल. यातील शेवटचा प्रभाग तीन नगरसेवकांचा असणार आहे. सध्या ३१ असलेली प्रभाग संख्या ३६ होईल. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे विद्यमान प्रभागांची रचना बदलून आकार कमी होण्याची शक्यता आहे.

दृष्टिक्षेपात

  • एकूण प्रभाग ३०

  • २८ प्रभाग त्रिस्तरीय

  • उर्वरित दोन प्रभागांत ४ सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com