
कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा विचार करण्यात आलाय
कोल्हापूर - महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये प्रभागाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. 92 जागांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये 46 जागा अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात केलेल्या अ, ब, क या विभागणीवर आक्षेप नोंदवले. तसेच मतपत्रिकाही त्यानुसारच होणार का असे प्रश्न विचारले. पण ओबीसी आरक्षण नसल्याने तसेच निवडणूक होण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश नागरिकांनी व इच्छुकांनी सोडत प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने सोडतीसाठी अल्प उपस्थिती होती.
प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली प्रथम अनुसूचित जातीच्या बारा जागांमधून सहा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर अनुसूचित जमाती साठी राखीव असलेल्या एका प्रभागासाठी चिठ्ठी टाकली. तो अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी खुला राहिला. सर्वसाधारण गटांमध्ये सर्वात जास्त महिला साठी आरक्षित जागा होत्या.
अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव न झाल्याने सर्वसाधारण गटामध्ये चाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. किमान दोन जागा बिन राखीव असलेल्या प्रभागातील एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली. त्यानुसार 31 जागांचे आरक्षण महिलांसाठी टाकण्यात आले. आणखी नऊ जागांसाठी आरक्षण टाकायचे असल्याने ज्या प्रभागात दोन जागा बिन राखीव होत्या. अशा सतरा प्रभागातून 9 महिलांसाठीच्या जागेसाठी सोडत काढण्यात आली. उर्वरित जागा सर्वसाधारण गटासाठी खुल्या ठेवण्यात आल्या.
दरम्यान, या सोडतीत अनुसूचित जाती, जमाती, तसेच सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढले आहे. यानंतर आता इच्छुकांच्या हालचाली गतिमान होणार आहेत. महापालिका प्रशासनाने सोडतीची तयारी पूर्ण केली असून, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली.
Web Title: Kolhapur Municipal Corporation Election 2022 Ward Reservation Update Of Kmc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..