मोटारीच्या धडकेत कोल्हापूर 'मनपा' आरोग्य विभागाचे चार कर्मचारी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

मोटारीच्या धडकेत कोल्हापूर 'मनपा' आरोग्य विभागाचे चार कर्मचारी जखमी

कोल्हापूर : आयसोलेएशन रिंगरोडवर आज सकाळी भरधाव मोटारीच्या धडकेत महापालिका आरोग्य विभागाचे चार कर्मचारी गंभीर जमी झाले. यामध्ये तिघा महिलांचा समावेश आहे. त्यामधील तिघा महिलांना सीपीआरमध्ये तर एकास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजाबाई घेवदे, वंदना भालकर, अर्चना सोळवंडे आणि विनायक कांबळे अशी जखमींची नावे आहेत.

पोलिस आणि घटनास्थळावरून दिलेली माहिती, आयसोलेएशन रिंगरोड परिसरातील झाडांच्या रस्त्यावर येणाऱ्या फांद्या छाटण्यात आल्या होत्या. त्या ट्रक्टरमधून जमा करून टाकण्याचे काम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास हे काम सुरू झाले.

दरम्यान साडेआठच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या एका चारचाकीने दिलेल्या धडकेत राजाबाई घेवदे, वंदना भालकर, अर्चना सोळवंडे आणि विनायक कांबळे हे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले. यामधील तिघा महिला कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या मदतीने सीपीआरमध्ये दाखल केले. तर कांबळे यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महापालिका अधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली. राजारामपुरी पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दक्षता न घेतल्याबद्दल नाराजी...

काम सुरू असताना बॅरेकेडस् लावून आवश्यक ती काळजी का घेतली गेली नाही? अशी जखमींचे नातेवाईक महापालिका अधिकाऱ्यांना विचारणा करत होते.

Web Title: Kolhapur Municipal Health Department Employees Injured In Road Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..