कोल्हापूर : महापालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार

महापालिका प्रभाग रचना आज जाहीर होणार
कोल्हापूर महापालिका
कोल्हापूर महापालिका sakal

कोल्हापूर: महापालिका निवडणुकीसाठी पहिला टप्पा असलेली व राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम झालेली प्रभाग रचना शुक्रवारी (ता. १३) जाहीर केली जाणार आहे. ती गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आज पुण्याला गेले. मार्चमध्ये महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेतील सहा प्रभागांच्या रचनेत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

राज्य शासनाने त्रिसदस्यीय प्रभाग रचना स्वीकारण्यास सांगितल्याने महापालिकेने ३१ प्रभाग तयार केले. ९२ सदस्य संख्या झाली होती. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. ती आता पूर्ण केली जात आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रभाग रचना जाहीर करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आज गॅझेटमध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी पुण्याला गेले. ती जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर, तसेच चारही विभागीय कार्यालयात, निवडणूक कार्यालयात पाहण्यास उपलब्ध होणार आहे. पूर्वीच्या प्रभाग रचनेतील सहा प्रभागांमध्ये किरकोळ बदल होणार असल्याचे समजते. ते नेमके बदल काय आहेत, हे रचना जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

या प्रक्रियेनंतर मतदार यादी निश्‍चित केली जाणार आहे. त्यासाठीही प्रभागनिहाय मतदार यादी फोडून त्याबाबतच्या हरकती, सूचना मागवण्यात येऊन ती अंतिम केली जाणार आहे. त्याचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com