कोल्हापूर : खड्ड्यांवरून मनपा प्रशासन धारेवर

महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांची बैठक

कोल्हापूर : सर्वत्र पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचे साम्राज्य, रस्त्यावरील दिवे बंद, भटक्या कुत्र्यांची वाढलेली दहशत यामुळे शहरवासीयांची वाईट अवस्था होत आहे. या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत खड्ड्यांबाबत निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत बैठकच न संपविण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुढील शुक्रवारपूर्वी पॅचवर्कच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने कामाला सुरुवात करून गणेशोत्सवपूर्वी पूर्ण काम केले जाईल, असे सांगितले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची आज प्रशासकांसोबत महापालिकेत बैठक झाली. यावेळी खड्ड्यांमुळे समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी प्रभागाला निधी दिला जायचा, त्याची तरतूद केली नसल्याने हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खड्डे, त्यात साठणारे पावसाचे पाणी, पथदीपांअभावी अंधार व भटक्या कुत्र्यांची दहशत अशा स्थितीत नागरिकांना ये-जा करावी लागते. याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी केल्या. यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत बैठकच संपणार नाही असे ठणकावले. अत्यावश्‍यक बाब म्हणून प्रथम काम करून घ्या,

असेही सुचविले.

प्रशासक डॉ. बलकवडे यांनी कमी कालावधीतील टेंडर करून पुढील शुक्रवारपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरूवात केली जाईल. त्यासाठीचा खड्ड्यांसाठीचा सर्व्हे झाला असल्याचे सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत कचरा संकलनाबाबत प्रशासनाने ट्रॅक्टर घेतले आहेत, दुपारी उठाव केला जाईल असे सांगितले होते. त्यांची पूर्तता झाली नसल्याची तक्रार केली. यावेळी प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी १० दिवसात कचरा दिसणार नाही असे सांगितले. रस्त्यावरील ईसीएलने बसवलेले एलईडी दिवे बंद आहेत.

दुरूस्ती नाही, बदलून दिले जात नाहीत. त्यामुळे मध्यवस्तीत अंधाराचे साम्राज्य असल्याने आगपाखड केली. दोन आठवड्यात संबंधित बंद दिवे बदलून दिले जातील. हायमास्टचे दिवेही सुरू केले जातील, असे सांगितले. भटक्या कुत्र्यांसाठी आणखी एक डॉग स्कॉड वाढवण्यात येईल. तसेच निर्बिजीकरणासाठी एक केंद्र वाढवले जाईल, असे प्रशासनाकडून सांगितले.

बैठकीत सचिन चव्हाण, आदिल फरास, सुनील मोदी, भूपाल शेटे, निलोफर आजरेकर, मधुकर रामाणे, अशोक जाधव, ईश्‍वर परमार, राजेंद्र साबळे, दुर्वास कदम, सुयोग मगदूम, डॉ. संदीप नेजदार, श्रावण फडतारे, महेश उत्तुरे, प्रतापसिंह जाधव, जय पटकारे आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत उपस्थित होते.

२५ लाख प्रत्येक प्रभागाला द्या

दोन ते तीन वर्षांत शहरातील विकासकामे शासनाच्या अनुदानातून होत आहेत. त्याबरोबर महापालिकेचा स्वनिधीही वापरला जाणे आवश्‍यक असताना तशी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विकासकामांबाबत नागरिकांच्या तक्रारी पाहता प्रत्येक प्रभागात २५ लाख निधीची तरतूद करावी, अशीही मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com