Parking arrangements are being prepared at 24 locations in Kolhapur city ahead of the Navratri festival.
esakal
कोल्हापूर,: नवरात्रोत्सव काळात शहरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन चोवीस ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. आरामबस, चारचारी, मोटारसायकल अशी पाच हजार वाहने एकाचवेळी थांबू शकतील अशी ही व्यवस्था असणार आहे. १५० पोलिस अंमलदार, १०० वाहतूक शाखेचे पोलिस व दीडशे होमगार्ड असा बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.