esakal | Kolhapur : आता वेध बाप्पांच्या आगमनाचे
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : आता वेध बाप्पांच्या आगमनाचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विघ्नहर्त्या बाप्पांच्या आगमनाचे वेध आता सर्वांना लागले असून बुधवार (ता. ८) पासून सर्वत्र मूर्ती वितरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. घरोघरी सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सार्वजनिक मंडळांनीही प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करत मंडप उभारणी केली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगल्लीत गर्दी होऊ नये, यासाठी मूर्तिकारांनी दोन दिवस अगोदरपासून मूर्ती घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. यंदा घरगुती बाप्पांचा मुक्काम पाच दिवसांचा, तर सार्वजनिक बाप्पांचा मुक्काम १० दिवसांचा राहणार आहे. गुरुवारी (ता. ९) हरितालिका व्रत होणार आहे.

उत्सवाला केवळ तीनच दिवस राहिल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे; मात्र मास्क व सोशल डिस्टन्स पाळण्यावर विक्रेते व दुकानदारांनी भर दिला आहे. महाद्वार रोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी रात्री दहापर्यंत गर्दी होत असून वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. गरजू पूरग्रस्त कुटुंबांना काही मंडळांतर्फे मोफत मूर्ती दिल्या जाणार आहेत. त्यासाठीही नोंदणी सुरू झाली आहे.

नारळाच्या शेंडीपासून साकारल्या मूर्ती

देवकर पाणंद राजलक्ष्मीनगर परिसरातील साईगुरू सुनील केसरकर याने नारळाच्या शेंडीपासून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. परिसरातच त्याने स्टॉल उभारला आहे. सहा इंचांपासून ते सव्वा फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत. लॉकडाउनच्या काळात शाळा, कॉलेज बंद असल्याने श्री. केसरकर यांनी साईगुरूला विविध कलाकृती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची संकल्पना पुढे आली आणि साईगुरूने विविध आकारांतील व रूपांतील मूर्ती साकारल्या आहेत.

loading image
go to top