अंध भगिनींनी घेतले साहसी प्रकारांचे धडे

kolhapur panhala blind girl special story
kolhapur panhala blind girl special story

पन्हाळा : ‘आम्ही जरी अंध असलो तरी आमच्याकडे विश्वास आहे, काही तरी करण्याची जिद्द आहे. म्हणूनच आम्ही रॅपलिंग, झिप लाईनसारख्या साहसी खेळांचा आस्वाद घेऊ शकलो,’ असा विश्वास नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि अंध युवा मंचच्या भगिनींनी मसाई पठाराच्या पायथ्याशी व्यक्त केला. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे. 

व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क, हिल रायडर्स फौंडेशन, व्हर्टाईस ॲडव्हेंचर्स, लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरतर्फे एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी अंध युवा मंचच्या ३० भगिनींना, मसाई पठाराखालील व्हर्टिकल ॲडव्हेंचर्स पार्कमध्ये आणले आणि झिप लाईन, रॅपलिंग, बंजी इजेक्‍शन, स्पोर्टस्‌ क्‍लायंबिंग, स्लॅक लाईन, हाय रोप कोर्स आदी साहसी प्रकारात सहभागी करून घेतले, डोळसांना आणि तरुणांच्याही अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या साहसी खेळांना या भगिनींनी उत्तम प्रतिसाद देत लीलया या खेळांचा आनंद घेतला.

क्रीडा प्रकारानंतर नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांनी नृत्यातील काही प्रकारचे धडे या भगिनींना दिले आणि क्षणात ते आत्मसात करत गाण्यासह ते करून दाखवून उपस्थितांना त्यांनी अचंबित केले. गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी गिर्यारोहणाविषयी माहिती दिली.

यावेळी पन्हाळा नगराध्यक्षा रुपाली धडेल, पल्लवी नायकवडी, माधवी भोसले, सरपंच शुभांगी कंदूरकर, वैशाली खरेतर, डॉ. धोंडीराम पाटील, आशिकी राऊत, प्रसाद संकपाळ, तन्वी शाह,  प्राजक्ता कुलकर्णी,वनपाल काशिलिंग बांधले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उत्तम महाडिक, ह्रषिकेश केसरकर, प्रमोद पाटील, पार्थ शाह, योगेश बगाडे यांनी परिश्रम घेतले.


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com