kolhapur : निष्ठेमुळे राजकीय भविष्य उज्ज्वल

बदलत्या राजकारणात एकनिष्ठ राहणे आवश्यक
Guardian Minister Satej Patil
Guardian Minister Satej Patilesakal

नेसरी : बदलत्या राजकारणात एकनिष्ठ राहणे आवश्यक आहे. आजचे राजकारण बेभरवशाचे आहे. राजकारण नेहमी वरखाली होत असते. कोणत्याही पक्षात एकनिष्ठेने काम केल्यास निश्‍चित फायदा होतो. त्याचे जिवंत उदाहरण म्हणून विद्याधर गुरबे यांच्याकडे पाहावे लागेल. एकनिष्ठतेमुळेच आम्हीही या पदापर्यंत पोहचू शकलो, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

Guardian Minister Satej Patil
Kolhapur : कोल्हापूर-सांगली मार्गावर कोंडी

नेसरी जि.प. मतदारसंघातील १५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यानिमित्त शिप्पूर तर्फ नेसरी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. संयोजक विद्याधर गुरबे, संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, इंदू नाईक, विजयराव पाटील, एम. जे. पाटील, डॉ. अनिल कुराडे, अजिंक्य चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Guardian Minister Satej Patil
Kolhapur : लाखोंची उलाढाल, पण रेकॉर्डच नाही

पाटील म्हणाले, ‘लोकांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी आजच्या घडीला गरजेचा आहे. गुरबे यांना कोठे संधी द्यायची, याची जबाबदारी माझ्यावर आहे, मात्र जनतेने विकासकामांचा ध्यास घेणाऱ्याच्या पाठीशी उभे राहावे.

Guardian Minister Satej Patil
Kolhapur : डेपोतील कचरा रस्त्यावर

गुरबे म्हणाले, ‘अपयशाने न खचता अनेक संकटाला तोंड देत विकासकामे करत राहिलो. सतेज पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे करता आली.’ यावेळी गोपाळराव पाटील, प्रशांत देसाई, अनिल पाटील यांची भाषणे झाली. बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, बाबूराव शिखरे, गोंविद पाटील, संदीप आदमापुरे उपस्थित होते. दतात्रय पाटील यांनी प्रास्ताविक, तर रामदास गुरव यांनी सूत्रसंचालन केले. बाबूराव गुरबे यांनी आभार मानले.

Guardian Minister Satej Patil
Kolhapur : दिवाळीच्या तोंडावर शिमगा

उचंगीचे श्रेय लाटू नये

गुरबे म्हणाले, ‘उचंगी प्रकल्पासाठी कै. बाबा कुपेकर, श्रीपतराव शिंदे, कै. तुकाराम कोलेकर, संध्यादेवी कुपेकर, बाबूराव गुरबे आदींनी प्रयत्न केले. सतेज पाटील यांच्या प्रशासकीय मदतीमुळे प्रत्यक्ष काम सुरू झाले. या सर्वांनी धरणग्रस्तांसोबत समन्वयाची भूमिका घेतली; पण उचंगी कोठे आहे, हे माहीत नसणाऱ्या ‍या लोकांचे फोटो पाणीपूजनावेळी लागले. चंदगडच्या आमदारांनी याचे श्रेय लाटू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com