कोल्हापूर : रेल्वेमार्गावरील मोरी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौथ्यांदा वाहतुकीस बंद झाला.

कोल्हापूर : रेल्वेमार्गावरील मोरी बंद

गांधीनगर : वळिवडे ते रुकडी रेल्वे मार्गादरम्यान ओढ्याच्या प्रवाहासाठी असलेली मोरी बंद केल्याने परिसरातील रहिवाशांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे रुळावर पाणी येऊन रेल्वे वाहतूक बंद होण्याचाही धोका आहे. येथे मोरी पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने येथील मोऱ्या रिकाम्या कराव्यात, अन्यथा त्यासाठी आंदोलन करावे लागेल, असाही इशारा स्थानिकांनी दिला आहे.

१८९४ पासून वळिवडे-रुकडी रेल्वेमार्गावर चिंचवाड (ता. करवीर) येथील गेट क्रमांक २३ च्या पश्चिमेला सहा फूट उंचीची दगडी मोरी बांधलेली होती. दरवर्षी या मोरीतून नैसर्गिक ओढ्याचे पाणी वाहून पुढे नदीला मिसळत होते. सहा ते सात वर्षांपूर्वी ही मोरी मोडकळीस आलेली पाहून रेल्वे खात्याने ही मोरी बंद करून टाकली. मोरीतून वाहून जाणारे पाणी साचून राहून परिसरातील शेतजमिनींत थांबू लागले. दरवर्षी हे पाणी थांबू लागल्याने या परिसरातील सुमारे सव्वाशे ते दीडशे एकर शेतजमिनी क्षारपड होऊ लागली. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात ही मोरी ओढ्याच्या पाण्याच्या वेगाने तुटून निघाली. याठिकाणची रेल्वे रुळाखालची भर वाहून गेली आणि पूल लोंबकळू लागले.

रेल्वे खाते आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून या ठिकाणी मोरी बांधणे गरजेचे असताना रेल्वे खात्याने हा भराव काँक्रिटच्या भिंती आणि भर घालून भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. ओढ्याचे पाणी कदाचित थांबले किंवा मार्ग बदलेल; दरम्यान, रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

रेल्वे खात्याने जुनी मोरी बंद करून येथील भराव भक्कम करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केला आहे. यामुळे दरवर्षी याठिकाणी पाणी साठून येथील पिकांचे नुकसान होऊन जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढेल.

- सिद्धोजीराव रणवरे, शेतकरी, चिंचवाड

या ठिकाणी असणारी मोरी पुन्हा बांधून नैसर्गिक प्रवाहाला वाट करून देणे गरजेचे आहे. भविष्यात पाऊस आणि महापुराचा फटका बसला तर वळिवडेला याचा धोका निर्माण होईल.

- अनिल पंढरे, सरपंच, वळिवडे

Web Title: Kolhapur Railway Line Closed Drainage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top