Kolhapur Rain : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर! 75 बंधारे पाण्याखाली; जाणून घ्या कोणते मार्ग सुरु, कोणते बंद

पंचगंगेची (Panchganga River) पाणीपातळी इशारा पातळीजवळ आली आहे.
Panchganga River
Panchganga Riveresakal
Summary

जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली आहेत. विविध ठिकाणीचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वच भागात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पंचगंगेची (Panchganga River) पाणीपातळी इशारा पातळीजवळ आली आहे. आधीच पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेचे पाणी काल सायंकाळी सहाच्या सुमारास गायकवाड पुतळ्याच्या रस्त्यावर आले.

राजाराम बंधाऱ्यावर रात्री १० वाजता नदीची पाणीपातळी ३६.७ फूट इतकी होती. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आहे. दरम्यान, राधानगरी धरण (Radhanagari Dam) ७० टक्के भरले असून, धरणातून वीजनिर्मितीसह एकूण १३५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

Panchganga River
निवडणुका जवळ आल्या, की मतदारसंघात दिसणारे केसरकर आहेत कुठे? पूरस्थितीवरुन ठाकरे गटाचा सवाल

जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली आहेत. विविध ठिकाणीचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. बुधवार (ता. २६) पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Panchganga River
Mumbai-Goa Highway: आता मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून करा बिनधास्त प्रवास; प्रशासनानं 'या' सुविधा केल्या उपलब्ध

उशिरा आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून धुवाँधार बरसात केली. मध्यरात्रीपासून पाऊस मुसळधार पडत होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर मांडुकली येथे रस्त्यावर रात्री नऊ वाजता पाणी आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती.

ही वाहतूक कळे, मल्हारपेठ, गवशी, गारीवडे मार्गानी सुरू ठेवण्यात आली. इचलकरंजी येथील जुना पूल पाण्याखाली गेला. करवीर तालुक्यातील कसबा बीड- महे येथील पालावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली. कडवी, शाळी, तुळशी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

Panchganga River
Sindhudurg Flood : येत्या दोन दिवसांत मुसळधार; जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गवासियांना केलं 'अलर्ट', पूरस्थितीची शक्यता!

सुतारमळ्याला दक्षतेच्या सूचना

पंचगंगेची वाढती पातळी लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमन दलाने शनिवारी रात्री उशिरा सुतारमळा येथील नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि गरज पडल्यास स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com