Kolhapur : स्थगित परीक्षा होणार पुढील आठवड्यात

वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता
Exam News
Exam Newsesakal
Updated on

कोल्हापूर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी विद्यापीठाने २ ते ४ फेब्रुवारी दरम्यानच्या एकूण २७४ परीक्षा स्थगित केल्या होत्या. या परीक्षा पुढील आठवड्यात घेण्याची तयारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सुरू केली आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक उद्या, बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यातील प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्या असताना विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केले. त्यामुळे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या तीन दिवसांतील २७४ परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, उच्च शिक्षण विभागाने परीक्षा वेळेत घेण्याची सूचना ३ फेब्रुवारी रोजी केली. त्यानुसार विद्यापीठाने सोमवारपासून परीक्षा पूर्ववत सुरू केल्या. त्यानंतर आता स्थगित केलेल्या परीक्षा पुढील आठवड्यात घेण्याची तयारी परीक्षा मंडळाने सुरू केली आहे. एम. एस्सी., बी. एस्सी., एमबीए., एम. कॉम., बी. ए., एमएसडब्ल्यू., बीसीए. अशा विविध १८ अभ्यासक्रमांची परीक्षा एकूण ५६९२ विद्यार्थ्यांनी मंगळवारी दिली.

दरम्यान, विद्यार्थी हित लक्षात घेऊन आमच्या प्रलंबित मागण्या, प्रश्‍नांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. बहिष्कार आंदोलन आमच्यावर लादण्यात आले आहे. मागण्यांची पूर्तता करून या आंदोलनाला पूर्णविराम द्यावा, अशी विनंती राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख यांनी दिली.

कामकाज करू नका, अशी धमकी

विद्यापीठ कर्मचारी संघ या बहिष्कार आंदोलनात सहभागी नाही. कर्मचारी संघाचे नियुक्त सभासद परीक्षेचे कामकाज करत आहेत. परीक्षा विभागात नियुक्त केलेले हायरिंग बेसिसवरील कर्मचारी (मानसेवी) या आंदोलन काळात परीक्षेचे कामकाज करत नाहीत. उलटअर्थी कामकाज करू नका, अशी धमकावणी देतात, असे आढळून आले आहे. या मानसेवींचा उपयोग आता होत नसेल, तर त्यांना तत्काळ कामावरून कमी करावे, या मागणीचे पत्र कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना दिले असल्याचे कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Savitribai Phule Pune University announced the revised schedule to ensure that candidates do not miss the SET examination.
Computer Typing Exam
MPSC has clarified that its Computer-Based Test (CBT) system is fully secure and protected against hacking and paper leaks.
Why Maharashtra TET exam was cancelled
Marathi News Esakal
www.esakal.com