कोल्हापूर : 'ऑक्सिजन देणारी मशीद'

सलग पाच महिने कोरोना रुग्णांना पुरवला मोफत प्राणवायू
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनसाठी अक्षरश: तरसावे लागले. प्राणवायूच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्तांचे हाल झाले. या कठिण काळात शनिवार पेठेतील एतिहासिक मणेर मशिद पुढे आली. घरी उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा करुन मानवतेचा नवा परमार्थ मुस्लिम बांधवानी साधला आहे. एप्रिल मध्ये सुरु झालेला हा सामाजिक उपक्रम सप्टेंबर अखेर पर्यत सुरु आहे. याच उपक्रमामुळे मणेर मशिदीची 'ऑक्सिजन देणारी मशिद' अशी ओळख सर्वदूर झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोल्हापूरला गाठले होते. रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमध्ये असे ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी रुग्णांची, नातेवाइकांची धडपड सुरु असल्याचे चित्र होते. यावेळी शनिवार पेठेतील शफीक मणेर हे एसी दुरुस्तीचे काम करतात. त्यांच्याकडे एक ऑक्सिजन सिलिंडर होते. हा सिलिंडर काही लोकांचे प्राण वाचवू शकतो. गरजुला हा सिलिंडर देण्याची कल्पना शफीक यांनी हिदायत मणेर यांच्यासमोर मांडली. या कल्पनेतून सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत 'मणेर मशीद' मार्फत घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला.

kolhapur
विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आवाहन करत या उपक्रमाची माहिती प्रसारीत करण्यात आली. अल्पावधीत रुग्णांच्या नातेवाईकांनी मशिदी समोर रांगा लावल्या. कुणाचे आई, वडील तर कुणाची पत्नीला ऑक्सिजनची गरज असायची. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून मशिदीचे स्वयंसेवक मोफत सिलेंडरचे वाटप करत होते. अगदी जिल्हाभरातून गरजु येथे ऑक्सिजन नेण्यासाठी लोक येत होते.

हा उपक्रम समजताच विजयालक्ष्मी डोंगळे, नौशाद बोबडे, आमिर चौगले, जहांगिर शेख अशा नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत ऑक्सिजनचे सिलेंडर मशिदीस पुरवले. मुस्लिम बांधव सलग पाच महिने ही सेवा पुरवत आहेत. हे कार्य मानवतेचे समजून रमजान ईद आणि बकरी ईद वेळी देखील इर्शाद टीनमेकर, इम्रान मणेर, सर्फराज बागवान, आसिफ मोमिन, महिबूब नदाफ आदी बांधवांनी या सेवेत झोकून दिले. सिलेंडर गरजू पर्यत पोहचवणे, फ्लो मीटर चेक करणे आदी कामे सर्वांनी केली. सर्व धर्मियांनी या उपक्रमात सहभागी होत हातभार लावला. मानवतेची सेवा करत 'दुआ' बरोबर 'दवा' पुरवण्याच्या कार्यामुळे मणेर मशिदचे सर्वत्र कौतुक होत आहे.

125 ऑक्सिजन सिलिंडर

10 ऑक्सिजन कॉन्सटेटर

3000 ते 4000 सिलिंडर पुरवले

1500 ते 2000 रुग्णांना फायदा

मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. याच भावनेतून मणेर मस्जीद ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमात अनेकांचा हातभार लागला. कठिण काळात धर्म - जात विसरुन माणसाने माणसाच्या मदतीला यावे हाच संदेश आम्हाला यातून द्यायचा होता.

- हिदायत मणेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com