Kolhapur: बस वाहतूकदारांची आरटीओंबरोबर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस वाहतूकदारांची आरटीओंबरोबर चर्चा

कोल्हापूर : बस वाहतूकदारांची आरटीओंबरोबर चर्चा

कोल्हापूर : गोवा, केरळप्रमाणे खासगी आराम बसेसना एसटी बस स्थानकात परवानगी मिळावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेने केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.

महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्या संपाला जिल्हा बस वाहतूक संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. सद्यस्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीवर लोकांची गैरसोय, हाल व त्रास होऊ नये, यासाठी संघटनेला प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी चर्चेसाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी सतीशचंद्र कांबळे यांनी आरटीओ विभागास सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

पण, बस वाहतूकदारांचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यांनी संघटनेतर्फे खासगी आराम बसेसना गोवा केरळ राज्यांप्रमाणे एसटी बस स्थानकात जाण्यास परवानगी मिळावी. खासगी आराम बसना तातडीने स्टेज कॅरेजचा परवाना कर्नाटक राज्याप्रमाणे द्यावा, अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या बस स्थानकाची मागणी त्वरित मंजूर करून आराखडा तयार करा, गुजरात व कर्नाटक राज्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व बांधणी करा आणि बस वाहतूकदारांवर विनाकारण कारवाई करून त्यांना वेठीस धरू नका, अशा मागण्या केल्या.

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, विजय इंगवले, संघटनेचे गौरव कुसाळे, मनोज चौगुले, दिलदार मुजावर, इम्तियाज हकीम, डी. के. पाताडे, फिरोज तहसीलदार, विवेकानंद मालेकर, रियाज मुजावर, फारूक मुल्ला, राजू ढाले, अशोक कोचीकोरवी, स्वरूप तोडकर, राहील रावथर, अहमद शेख, लियाकत मुजावर, आकाश कांबळे, आफताब तहसीलदार, उत्कर्ष पवार, मधुकर माने, अरुण देवकुळे, अतुल कवाळे, जाकिर तहसीलदार उपस्थित होते.

loading image
go to top