

Kolhapur Factory Strike: शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडलं आहे. मागील तीन दिवसांपासून कोपार्डे येथे सुरु असलेल्या आंदोलनानंतर सोमवारी आंदोलक आणि प्रशासनाची बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्पळ ठरली असून उद्यापासून एकही साखर कारखाना चालू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.