Kolhapur Airport : कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा 'या' तारखेपासून दररोज सुरू होणार; महाडिकांनी दिली महत्वाची अपडेट

आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू होत असल्याने कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीला मिळणार चालना
Dhananjay Mahadik Kolhapur Airport
Dhananjay Mahadik Kolhapur Airportesakal
Updated on
Summary

रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान झेपावेल. सकाळी साडेदहा वाजता ते कोल्हापुरात येईल.

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा १ ऑक्टोबरपासून दररोज सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली. महाडिक यांनीच यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला हे यश आले आहे.

Dhananjay Mahadik Kolhapur Airport
Ashok Chavan : कोल्हापूर-मुंबईत दहा बैठका घेतल्या, तरीही मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही; असं का म्हणाले माजी मुख्यमंत्री?

‘स्टार एअर’ (Star Air) या नामांकित विमान कंपनीकडून ही सेवा सुरू होत आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सध्या आठवड्यातून तीन दिवसच विमानसेवा सुरू होती. ही सेवा दररोज सुरू व्हावी, अशी मागणी कोल्हापूरच्या उद्योगजगतातून होत होती; पण मुंबई विमानतळावर यासाठी स्लॉट मिळत नसल्याने त्यात अडचणी येत होत्या.

Dhananjay Mahadik Kolhapur Airport
ST Bus News : महिलांसाठी खुशखबर! आता 'इतक्या' रुपयांत घेता येणार अष्टविनायक दर्शन; मार्लेश्वरसाठी स्पेशल बस

अखेर १ ऑक्टोबरपासून स्टार एअर कंपनीने ही सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. १ ऑक्टोबरपासून सातही दिवस ही विमान सेवा सुरू राहील, अशी माहिती महाडिक यांनी दिली. या विमानसेवेमुळे व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे.

सकाळी विमान कोल्हापुरात येईल आणि परत मुंबईला जाईल. त्यामुळे दिवसभरातील मुंबईतील कार्यालयीन कामे करणे सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा सुरू होत असल्याने, निश्चितच कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

Dhananjay Mahadik Kolhapur Airport
Sulkud Water Scheme : इचलकरंजीला सुळकूडमधून पाणी दिल्यास उद्रेक होईल; हसन मुश्रीफांचा गर्भित इशारा

विमानाच्या वेळा अशा

रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान झेपावेल. सकाळी साडेदहा वाजता ते कोल्हापुरात येईल. त्यानंतर दहा वाजून पन्नास मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने उड्डाण करेल आणि अकरा वाजून पन्नास मिनिटांनी विमान मुंबई विमानतळावर उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com