कोल्हापूरचा नाद करायचा नाय! सख्खे भाऊ बनले जागतिक संशोधक

डॉ. शरदराव व्हनाळकर व डॉ. सागर व्हनाळकर यांचे यश
कोल्हापूरचा नाद करायचा नाय! सख्खे भाऊ बनले जागतिक संशोधक

गारगोटी : ए. डी. सायंटिफीक इंडेक्स (AD scientific index) या आंतरराष्ट्रीय संशोधन (international reaserch) मानांकन संस्थेने २०२१ या वर्षासाठी प्रकाशित केलेल्या जागतिक (global level) स्तरावरील अव्वल संशोधकांच्या यादीत मौनी विद्यापीठातील (mauni university) दोघांनी ठसा उमटवला आहे. कर्मवीर हिरे महाविद्यालयातील डॉ. शरदराव व्हनाळकर व डॉ. सागर व्हनाळकर या युवा संशोधकांनी स्थान मिळवले आहे. जगातील सुमारे १६७ देशांतील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थेत कार्यरत नामवंत संशोधकांच्या यादीत स्थान मिळवून दोघांनी संशोधकांनी मौनी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोचला आहे. विशेष म्हणजे डॉ. शरदराव व डॉ. सागर व्हनाळकर हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

ए. डी. सायंटिफीक इंडेक्स या संस्थेने जगातील सुमारे १६७ देशांतील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थेत कार्यरत शास्त्रज्ञांचे गेल्या पाच वर्षातील संशोधन कार्य, त्यांची प्रकाशने, त्यांचा दर्जा, प्रकाशनांचा संदर्भ म्हणून इतर संशोधकांनी केलेला वापर, एच व आय इंडेक्स आदी निकष वापरून ही यादी तयार केलेली आहे. या यादीत डॉ. शरदराव व्हनाळकर यांचा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व नॅनोतंत्रज्ञान या क्षेत्रात तर डॉ. सागर व्हनाळकर यांचा कृषी, पर्यावरण व जीवशास्त्र या क्षेत्रात समावेश आहे. डॉ. शरदराव व्हनाळकर हे कर्मवीर हिरे महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागप्रमुखपदी व डॉ. सागर व्हनाळकर हे प्राणीशास्त्र विभागप्रमुख तसेच बी. एस्सी. विभागाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

कोल्हापूरचा नाद करायचा नाय! सख्खे भाऊ बनले जागतिक संशोधक
न्यूझीलंडच्या फायटोटॅक्सा नियतकालिकात झळकली ‘जैतापुरेंनसीस चांदोरे-एस. आर. यादव’ फुलवनस्पती!

निगवे खालसा (ता. करवीर) येथील दोघे भाऊ असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातीलच चनिशेटी विद्यालयात पूर्ण आहे. पदव्युत्तर शिक्षण व पीएच. डी. शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केली. डॉ. शरदराव व्हनाळकर यांनी यापूर्वी चेनोम राष्ट्रीय विद्यापीठ, ग्वान्गझू (दक्षिण कोरिया), आयवा विद्यापीठ, आयवा (अमेरिका), टयुबॅक विद्यापीठ, तुर्की येथे संशोधन केले आहे. त्यांना केंद्र शासशाचा युवा संशोधक पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी सौरघट निर्मितीसाठी विविध संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले असून त्यांच्या नावावर एक पेटंट आहे. त्यांना मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील, चेअरमन आशिष कोरगांवकर, संचालक डॉ. आर. डी. बेलेकर, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे मार्गर्शन व प्रोत्साहन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com