कोल्हापूर : दोनवडेची व्यसनमुक्ती घडविणारी वारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur wariDetoxification de-addiction

कोल्हापूर : दोनवडेची व्यसनमुक्ती घडविणारी वारी

कुडित्रे : दोनवडे येथील सद्‍गुरू ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळाने नऊ वर्षांपासून पायी दिंडीची परंपरा सुरू केली. व्यसनमुक्ती घडवणारी दिंडी अशी या दिंडीची ओळख असून, नऊ वर्षांत अनेक शेतकरी व्यसनमुक्त झाले आहेत. गावातील ज्योतिर्लिंग मंदिरात काल (ता. १) आरती झाल्यावर चौकात वीणापूजन झाले आणि दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

यंदाच्या दिंडीत सुमारे ७० वारकऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश वारकरी शेतकरी आहेत. अनेक शेतकऱ्यांना तंबाखू, मद्याचे व्यसन होते. वारकरी संप्रदायात आल्यावर ते व्यसनापासून परावृत्त झाले आहेत. गावातील ज्योतिर्लिंग मंदिराच्या सभोवताली शेड करून सुशोभीकरण करण्यात आले असून, तेथे विविध धार्मिक विधी होतात. एकादशीला विविध धार्मिक कार्यक्रमांसह वर्षभर ग्रंथ वाचनाची परंपराही मंडळाने जपली आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजनही केले जाते.

दोनवडेतून बालिंगा येथील महादेव मंदिर, फुलेवाडी दत्त मंदिर, शिवाजी पेठ येथील रामचंद्र यादव महाराज मंडपात भेटी देऊन दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. मधुकर गुरव यांच्याकडे चोपदारपदाचा मान असून, आज हातकणंगलेत दिंडीचा मुक्काम राहिला. धामणी फाटा, म्हसोबा टेकडी, जुनोनी, मंगेवाडी, संगेवाडीमार्गे दिंडी पंढरपूरकडे जाणार असल्याचे भजनी मंडळाचे अशोक पाटील, दिलीप पाटील यांनी सांगितले. बाजीराव पाटील, सर्जेराव नलवडे, बाबासो सुतार, बाजीराव बाबू पाटील, आनंदी पाटील, यशोदा कळके, किसाबाई पाटील यांच्यासह २४ हून अधिक महिला व परिसरातील वारकऱ्यांचा दिंडीत समावेश आहे.

Web Title: Kolhapur Waridetoxification De Addiction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..