Kolhapur : कला, प्रतिभा विकासासाठी योगाभ्यास आवश्यकच

कला आणि प्रतिभा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
navratri festival 2022
navratri festival 2022sakal

कला आणि प्रतिभा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याची साधना करायची असेल, तर चित्त एकाग्रता अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यासाठीची ऊर्जा देणारे सर्वात मोठे साधन अथवा मुख्य ऊर्जा स्त्रोत म्हणजे योगाभ्यास. अगदी भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून या गोष्टींचा ऊहापोह झाला असून, लेखनापासून सादरीकरणापर्यंत लेखक असो किंवा अभिनेता त्याला न्यूट्रल लेव्हलला राहूनच काम करावे लागते आणि त्याला ते जमले तरच तो सर्वोत्कृष्ट आविष्काराची अनुभूती देऊ शकतो...अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर संवाद साधत असतात आणि कला व प्रतिभेच्या ऊर्जेचा स्त्रोत कसा टिकवावा, याबाबतच्या मौलिक टीप्स मिळत असतात.

अभिनेत्री खटावकर या हिंदी, मराठी सिने-नाट्यसृष्टीतील पहिल्याच पीएच.डी मिळवलेल्या अभिनेत्री आहेत. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी नाटकातील निवडक भूमिकांचा अभिनयाच्या दृष्टिकोनातून अभ्यास’ या विषयातील ‘संवादालेख’ या नावीन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण संशोधनासाठी त्यांना पाच वर्षांपूर्वी ही पदवी मिळाली.

विविध प्रकारच्या चिन्हांचा वापर करून कुठला संवाद कसा म्हणायचा, आवाजातील चढ-उतार यावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवायचे, त्यासाठीची ऊर्जा कशी टिकवावी, आदी गोष्टींचा अभ्यासपूर्ण संवादलेख त्यांनी नव्या पिढीसमोर ठेवला आहे.

डॉ. खटावकर सांगतात, ‘‘भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रात नृत्य, संगीतापासून रंगमंचाचे वर्णन, शारीरिक हालचाली अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव आहे. मुळात नटराजाच्या रूपानं शिवाने पहिल्यांदा आविष्कार सादर केला. साहजिकच या विश्वातील पहिला नट म्हणजे शिवा म्हणजेच शिवशंकर. शिवानेच योगशास्त्राची निर्मिती केली.

प्राचीन काळापासून आजपर्यंत अभिनेता असो किंवा लेखनासाठीचा दृष्टिकोन विकसित करताना प्रत्येकाला समतोल राहूनच काम करावे लागते. ओमकार, ध्यान, प्राणायाम, दीर्घ श्वसन या गोष्टी वाचिक, सात्विक अभिनयासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या जोरावरच अनेकांनी आपापल्या विविध व्यंगावर मात करून अभिनयात नैपुण्य मिळवलेली अनेक उदाहरणं आहेत.

हे आवश्यकच...

लेखक असो किंवा अभिनेता एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मानसिक संतुलन महत्त्वाचे. त्यासाठी ओमकार, ध्यानधारणा, योगाभ्यास आवश्यकच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com